हदगाव / नांदेड – मागच्या काही महिन्यापूर्वी घडलेली घटना म्हणजेच पाकिस्तान व अफगाणिस्तान या देशाशी संबंध असणारी एजंट म्हणून काम करणारी व स्वतःला तोतया आयपीएस अधिकारी भासवणारी कल्पना भागवत यांच्याशी आर्थिक पैशासंबंधीत संपर्कात आलेले हिंगोली चे उबाठा गटाचे खा. नागेश पाटील आष्टीकर यांची याप्रकरणी सखोल चौकशी होऊन जनतेस या प्रकरणी पूर्ण माहिती व्हावी याकरिता मी स्वतः देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी करणार असून या घटनेस आ.कोहळीकर यांनी सुद्धा सहमती दर्शवीत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुद्धा चौकशीची मागणी करणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
याप्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनिल पा. बाभळीकर यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना माजी खा. वानखेडे म्हणाले की, देशद्रोही असणाऱ्याशी आर्थिक देवाण-घेवानातून प्रकाशझोतात आलेले खा. नागेश आष्टीकर यांच्या जागी जर एखादा मुस्लिम समाजाचा खासदार राहिला असता तर आतापर्यंत विविध संस्थांच्या चौकशीच्या माध्यमातून त्यास तुरुंगात पाठविले असते पण खा.नागेश पा. आष्टीकर यांची आतापर्यंत या गंभीर घटनेनंतर सुद्धा साधी चौकशी झाली नसल्याचे सांगितले.
या देशात एकाला एक न्याय व दुसऱ्या पाठीराखाण न करता त्याची पूर्ण चौकशी होणे गरजेचे असल्याचे सुद्धा सांगितले.कर नाही त्याला डर कशाला त्याप्रमाणे चौकशी होणे फार गरजेचे असून शेवटी आपल्या देशाच्या सुरक्षितेचा प्रश्न आहे तर आ. कोहळीकर म्हणाले की, प्रथमता आपल्यास कागदोपत्री व पुराव्यानिशी एवढी रक्कम दिली हे उजागर झाले असून याच्या व्यतिरिक्त आणखीन काळा पैसा किती दिला असेल याची सुद्धा चौकशी होणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले म्हणून लवकरच मी आणि माझी खासदार सुभाषराव वानखेडे हे देशाचे गृहमंत्री अमित शहा व राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशीची मागणी करणार आहोत.
















