नवीन नांदेड – स्वच्छता, कीर्तनकार, श्रम प्रतिष्ठा अंधश्रद्धा निर्मूलनाचा दीपप्रज्वलित करणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त सिडको संभाजी चौक येथील संत गाडगेबाबा स्मारक येथे दिनांक २० डिसेंबर रोजी भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
सिडको येथील राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचे स्मारक येथे त्यांच्या पुण्यतिथी निमित्त भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्रातील थोर समाज सुधारक कीर्तनकार आणि स्वच्छता, शिक्षण, दीनदुबळ्यांची सेवा करण्यासाठी आपले जीवन समर्पित करणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन संभाजी चौक येथील स्मारकात करण्यात आले.
यावेळी ॲड.प्रसेनजीत वाघमारे, निखिलेश देशमुख, प्रशांत गच्चे, पि.के. रोडे यांच्यासह परिसरातील शेकडो नागरिकांची उपस्थिती होती


























