Sunday, April 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पंढरपूर नगरपरिषद निवडणूकीत सत्ताधारी परिचारकांच्या नेतृत्वाखालील भाजापाची गड आला पण सिंह गेला अशी अवस्था

तरुण भारतbyतरुण भारत
December 22, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
49
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – संपुर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणूकीत सत्ताधारी परिचारकांच्या नेतृत्वाखालील भाजपाची गड आला पण सिंह गेला अशी अवस्था झाली.कारण पंढरपूर पालिकेच्या या निवडणूकीत एकीकडे भाजपा आणि मित्रपक्ष आघाडीचे तब्बल २४ नगरसेवक निवडून आले तर दुसरीकडे सर्वात महत्वाच्या अशा नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत मात्र विरोधी तिर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदेवार डाँ.प्रणिता भालके यांनी तब्बल ११ हजार १३६ मतांनी भाजपाच्या उमेदवार शामल लक्ष्मण शिरसट (पापरकर ) यांचा पराभव केला. या निवडणूकीत भालकेंच्या तिर्थक्षेत्र आघाडीला नगरसेवकपदाच्या केवळ ११ जागांवर समाधान मानावे लागले. एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला.


पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणूकीची मतमोजणी येथील तहसील कार्यलया समोरील शासकीय धान्य गोदामा मध्ये रविवारी सकाळी दहा वाजता सुरु झाली. एकुण नऊ फेऱ्यामध्ये सर्व निकाल जाहीर झाले. दुपारी अडीचच्या सुमारास नगराध्यक्षपदासह ३५ नगरसेवकपदाचे निकाल घोषित झाले. मतदाना पूर्वीच प्रभाग क्रमांक पाच (अ) मधुन भाजपाच्या परचंडे या बिनविरोध निवडून आलेल्या होत्या. त्यामुळे भाजपाने पालिकेत सुरुवातीलाच एकने खाते उघडले होते. दरम्यान मतमोजणीच्यावेळी प्रभाग क्रमांक एक पासूनच नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डाँ.प्रणिता भालकें यांची विजयी घौडदौड सुरु झालेली दिसून आली. नगराध्यक्षपदाची निवडणूक जनते मधून असल्यामुळे पहिल्या फेरीनंतरच नगराध्यक्षपदासाठी नागरिकांचा डाँ.प्रणिता भालकेंना कौल असल्याचा अंदाज आला होता.एकुण नऊ फेरी मध्ये नगराध्यक्षपदासाठी डाँ.प्रणिता भालकेंनी सुमारे ११ हजार १३६ मतांचे मताधिक्य घेऊन प्रतिस्पर्धी उमेदवार शामल लक्ष्मण शिरसट (पापरकर ) यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.


दुसरीकडे नगरसवेक पदासाठी झालेल्या मतमोजणी मध्ये प्रत्येक प्रभागात रंगत दिसुन आली.पालिकेच्या एकुण १८ प्रभागातून ३५ नगरसेवक पदाच्या उमेदवारांसाठी मतदान झालेले होते. या मध्ये परिचारकांच्या नेतृत्वाखालील भाजप मित्रपक्ष आघाडीला २४ जागा मिळाल्या.विरोधी तिर्थक्षेत्र आघाडीचे ११ नगरसेवक विजयी झाले. तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला.
पालिकेच्या या निवडणूकी मध्ये विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष तथा माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी देखील विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी स्थापन करुन सुमारे १२ नगरसेवकपदासाठीचे उमेदवार उभे केलेले होते.विशेष म्हणजे या निवडणूकी मध्ये आमदार पाटील यांच्या विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीला साधे खाते देखील उघडता आले नाही.
पालिकेच्या निवडणूकीतील प्रभागा नुसार विजयी उमेदवार पुढील प्रमाणे –
प्रभाग क्रमांक १ (अ) – लखन जंबू चौगुले (भाजपा) आणि प्रभाग क्रमांक १ (ब) – अर्चना गणेश शिंदे (भाजपा)
—————-
प्रभाग क्रमांक २ (अ) –प्रसाद प्रकाश कळसे (तिर्थक्षेत्र विकास आघाडी,पंढरपूर) आणि  प्रभाग क्रमांक २ (ब) – प्रणिता किरण घाडगे (तिर्थक्षेत्र विकास आघाडी,पंढरपूर)
———————-
प्रभाग क्रमांक ३ (अ) – तेजश्री रोहित पानकर (भाजपा) आणि प्रभाग क्रमांक ३ (ब) – अक्षय प्रताप गंगेकर (तिर्थक्षत्र विकास आघाडी,पंढरपूर).
——————-
प्रभाग क्रमांक ४ (अ) – विनायक कुमार संगितराव (भाजपा) आणि प्रभाग क्रमांक ४ (ब) – प्रियांका सागर तारापूरकर (भाजपा),
——————
प्रभाग क्रमांक ५ (अ) – कुसुम जगन्नाथ परचंडे ( भाजपा, बिनविरोध) आणि प्रभाग क्रमांक ५ (ब) – ओंकार अभय जोशी (अपक्ष).
———————–
प्रभाग क्रमांक ६ (अ) – सुजितकुमार एकनाथ सर्वगोड (पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी,पंढरपूर) आणि प्रभाग क्रमांक ६ (ब) – रेहाना इब्राहिम बोहरी (पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी,पंढरपूर)
———————-
प्रभाग क्रमांक ७ (अ) – शिला शरद माने (भाजपा) आणि प्रभाग क्रमांक ७ (ब) – भागवत त्रिंबक बडवे (भाजपा )
———————
प्रभाग क्रमांक ८ (अ) – मनिषा धनंजय देशपांडे (भाजपा) आणि प्रभाग क्रमांक ८ (ब) – प्रदीप दिलीप पवार (भाजपा).
———————-
प्रभाग क्रमांक ९ (अ) –प्रतिक्षा विक्रम शिरसट (भाजपा) आणि प्रभाग क्रमांक ९ (ब) – संदिप पांडुरंग अधटराव (भाजपा),
———————–

प्रभाग क्रमांक १० (अ) – साधना सुधीर धोत्रे (तिर्थक्षेत्र विकास आघाडी,पंढरपूर) आणि प्रभाग क्रमांक १० (ब) – संजय जवाहरलाल बंदपट्टे (तिर्थक्षेत्र विकास आघाडी,पंढरपूर).
————————
प्रभाग क्रमांक ११ (अ) –अनिता सिकंदर ढवळे (भाजपा) आणि प्रभाग क्रमांक ११ (ब) – बालाजी अरुण मलपे (भाजपा).
————————–
प्रभाग क्रमांक १२ (अ) – निता नितीन परचंडे (भाजपा) आणि प्रभाग क्रमांक १२ (ब) –विशाल दगडू मलपे (भाजपा)
————————-
प्रभाग क्रमांक १३ (अ) – रुक्मिणी धनाजी धोत्रे (तिर्थक्षेत्र विकास आघाडी,पंढरपूर) आणि प्रभाग क्रमांक १३ (ब) – नागेश आण्णासाहेब भोसले (तिर्थक्षेत्र विकास आघाडी,पंढरपूर).
————————
प्रभाग क्रमांक १४ (अ) –उज्वला महादेव भालेराव (पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी) आणि प्रभाग क्रमांक १४ (ब) –  महादेव माणिक धोत्रे (पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी),
————————–
प्रभाग क्रमांक १५ (अ) –धर्मराज आण्णाप्पा घोडके (भाजपा) आणि प्रभाग क्रमांक १५ (ब) – स्मिता आदित्य फत्तेपूरकर (तिर्थक्षेत्र विकास आघाडी )
————————-
प्रभाग क्रमांक १६ (अ) – अमोल विठ्ठल डोके (भाजपा) आणि प्रभाग क्रमांक १६ (ब) – संध्या मालोजी शेंबडे (भाजपा),
—————————-
प्रभाग क्रमांक १७ (अ) – लोकेश नागनाथ यादव (तिर्थक्षेत्र विकास आघाडी,पंढरपूर) आणि प्रभाग क्रमांक १७ (ब) – माधुरी दिलीप धोत्रे (तिर्थक्षेत्र विकास आघाडी,पंढरपूर)
—————————
प्रभाग क्रमांक १८ (अ) – विनायक बसवेश्वर देवमारे (तिर्थक्षेत्र विकास आघाडी,पंढरपूर) आणि  प्रभाग क्रमांक १८ (ब) – ज्योती अशोक शिंदे ( भाजपा )
———————–
चौकट : ( लाव रे तो व्हिडिओचा मोठा इफेक्ट )
नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डाँ.प्रणिता भालके यांच्या शेवटच्या प्रचार सभेत भगिरथ भालकेंनी येथील शिवतिर्थावर सभा घेऊन त्या मध्ये लाव रे तो व्हिडिओ म्हणत परिचारकांनी शहरात केलेल्या विकास कामांच्या दाव्याची पोलखोल केली. त्यामुळे देखील भालकेंच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.
———————-
चौकट : (स्वर्गीय भारत भालकेंवरील टिका मतदारांना रुचली नाही)
पंढरपूर शहरात आमदार भारत भालके यांची एक वेगळी क्रेझ होती. (स्व.) भारतनाना भालकें यांच्या विषयी आजही शहरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये सहानुभूती आहे. मात्र नगरपालिका निवडणूकी दरम्यान माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी प्रचार सभेतून (स्व.) भारत भालके यांचा ऐकेरी उल्लेख करीत त्यांच्यावर केलेली टिका सर्वसामान्य मतदारांना रुचली नाही. त्यामुळे त्याचा देखील मोठा परिणाम नगराध्यक्षपदाच्या मतदानातून दिसुन आला.
——————————
चौकट : ( क्राँसव्होटिंगचा फटका )
पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडती मध्ये नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षीत झालेले होते. मात्र सर्वसाधारण महिला जागेवर परिचारकांच्या नेतृत्वाखालील भाजपा मित्रपक्ष आघाडीच्या वतीने ओबीसी प्रवर्गातील महिला उमेदवार शामल लक्ष्मण शिरसट (पापरकर ) यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे देखील भाजपाच्या शामल पापरकर या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला क्राँसव्होटिंगचा मोठा फटका सहन करावा लागला.

Post Views: 140
Previous Post

करमाळ्यात शहर विकास आघाडीचा भाजप व शिवसेनेला दे धक्का

Next Post

अवैधवाळूसह १ कोटी ६ लाख ८० हजार रुपये किंमतीची वाहने जप्त

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

अवैधवाळूसह १ कोटी ६ लाख ८० हजार रुपये किंमतीची वाहने जप्त

ताज्या बातम्या

अक्कलकोट नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न – विकासाच्या अनेक निर्णयांवर शिक्कामोर्तब!

अक्कलकोट नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न – विकासाच्या अनेक निर्णयांवर शिक्कामोर्तब!

April 19, 2026
मध्यरात्री शस्त्रास्त्रांच्या साठ्यासह पिस्तूलधारी जेरबंद; अश्लील डान्स बारवरही पोलिसांचा वरवंटा

मध्यरात्री शस्त्रास्त्रांच्या साठ्यासह पिस्तूलधारी जेरबंद; अश्लील डान्स बारवरही पोलिसांचा वरवंटा

April 19, 2026
डॉ. सतीश कोपुरवाड सोलापूरचे नवे जिल्हा आरोग्य अधिकारी

डॉ. सतीश कोपुरवाड सोलापूरचे नवे जिल्हा आरोग्य अधिकारी

April 19, 2026
महात्मा बसवेश्वरांनी केली स्त्री स्वातंत्र्याची सुरुवात – चाकोते

महात्मा बसवेश्वरांनी केली स्त्री स्वातंत्र्याची सुरुवात – चाकोते

April 19, 2026
अक्षय तृतीया दिवशी बसवेश्वर यात्रा होणार

अक्षय तृतीया दिवशी बसवेश्वर यात्रा होणार

April 19, 2026
भंडीशेगाव व रोपळे मंडळात १ हजार ६०६ दाखले सेवांचे वितरण – तहसीलदार लंगुटे

भंडीशेगाव व रोपळे मंडळात १ हजार ६०६ दाखले सेवांचे वितरण – तहसीलदार लंगुटे

April 19, 2026
भव्य रोजगार मेळावा संपन्न

भव्य रोजगार मेळावा संपन्न

April 19, 2026
फिजिक्सवालाच्या विद्यार्थ्यांचे सीबीएसई दहावीमध्ये विक्रमी यश

फिजिक्सवालाच्या विद्यार्थ्यांचे सीबीएसई दहावीमध्ये विक्रमी यश

April 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0818122

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697