सांगोला – शहरातील सुवर्णा तेली, हर्षदा गुळमिरे आणि मनीषा ठोंबरे या तीन कवयत्रींना सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात काव्यवाचन व सादरीकरणासाठी निमंत्रण मिळाले आहे.
या संमेलनात दि.१ जानेवारी रोजी सुवर्णा तेली, दि.२ जानेवारी रोजी हर्षदा गुळमिरे तर दि.४ जानेवारी रोजी मनीषा ठोंबरे काव्यसादरीकरण करणार आहेत.
मनीषा ठोंबरे यांचे काव्यपूर्ती आणि भावगंध हे दोन काव्यसंग्रह यापूर्वीच प्रकाशित झाले असून हर्षदा गुळमिरे आणि सुवर्णा तेली यांचे काव्यसंग्रह सध्या प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सांगोला शहरासह साहित्य क्षेत्रातून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
















