पिलीव – बाजारात गेल्या जुन महिन्यापासून सोने व चांदीच्या दरात सातत्याने प्रचंड वाढ होत आहे .जुन ते डिसेंबर महिन्यापर्यंत जर दर पाहीले तर दरात प्रचंड वाढच होत चालली आहे .जुन महीन्यात सोने 98हजार 674 रुपये तर चांदी 1 लाख 1 हजार 970 रुपये एवढा दर होता .तर तोच दर 23 डिसेंबर रोजी सोन्याचा दर 1 लाख 41 हजार 110 एवढा तर चांदीचा दर 2 लाख 17 हजार 845 रुपये एवढा उच्चांकी दर वाढ सोन्याच्या व चांदीच्या दरात झाली आहे.डिसेंबर महिन्यात 22 डिसेंबर रोजी फक्त एकाच दिवसात सोन्याचा दर प्रति ग्रॅम 6 हजार 210 रुपयांनी तर चांदीचा दर 8 हजार 345 रुपयांने महागला.
डिसेंबर महिन्यात चांदीचा दर पहील्या पंधरा दिवसात पन्नास हजार रुपयांनी महागला.2025 हया वर्षात सोन्याचा व चांदीच्या दरात प्रचंड उच्चांकी दरवाढ झाली आहे .वाढत्या दरामुळे संपूर्ण डिसेंबर महीन्यात सोने व चांदी खरेदीचा ग्राहकांचा प्रतिसाद अतिशय थंडावला आहे .ह्या प्रचंड दरवाढीचा फटका सर्व सामान्य ग्राहकांना सर्वात जास्त बसला आहे कारण आपल्या कौटुंबिक व इतर गरजा भागवुन सोने चांदी खरेदी करणे त्यांना शक्य होत नाही.आगामी काळात सोने व चांदीच्या दरात प्रचंड मोठी दरवाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यामुळे भविष्यात सर्वसामान्य कुटुंबातील म्हणजेच ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची किंवा हलाखीची आहे अश्या कुटुंबांना सोने _ चांदी खरेदी करणे अतिशय खडतर होणार आहे.जे नोकरदार, मोठे व्यावसायिक किंवा बागायतदार यांनाच भविष्यात सोने चांदी खरेदी करणे शक्य होणार आहे.पुर्वीच्या काळात ज्यांनी सोने चांदी खरेदी करुन ठेवले आहे अश्या कुटुंबांना माञ वाढत्या दरवाढीमुळे बँकेत सोने तारण करुन त्यावर कर्ज काढून आपल्या अडी अडचणी भागविणे सहज शक्य होत आहे .तर सध्या लग्न समारंभात मुलीला सोन्याचे मंगळसूत्र किंवा इतर वस्तु करणे सर्वसामान्य कुटुंबाला सहजासहजी शक्य होणार नाही .यामुळे वाढत्या दराचा लग्न समारंभाचे बजेट वाढविले आहे .सोने चांदीच्या वाढत्या दराचा सर्व सामान्य कुटुंबातील व्यक्तींना खरेदी करणे प्रचंड जिकरीचे होऊन बसले आहे यामुळेच सध्या ग्रामीण भागातील महीलानी दरवाढीचा चांगलाच धसका घेतला आहे .
गेल्या पाच _ सहा महिन्यापासून सोने व चांदीच्या दरात प्रचंड मोठी वाढ झाली आहे यामुळे आमच्याकडे खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या अतिशय कमी झाली आहे . _ अंबिका ज्वेलर्स, पिलीव, अमोल कदम .
सोने व चांदीच्या दरात प्रचंड मोठी वाढ झाल्यामुळे आता खरेदी करणे अवघड झाले आहे . __ स्वाती मदने
















