गाणगापूर : गुरूतत्व प्रदीप या पारमार्थिक समूहाच्या वतीने आयोजित संकल्पित श्री संत दासगणू महाराज विरचित श्री गुरुचरित्र सरामृत परायणाचे नववे पुष्पाला श्री क्षेत्र गाणगापूर येथे दिनांक २५ डिसेंबर पासून प्रारंभ झाला आहे
कार्यक्रमाची सुरुवात श्री स्वामी महाराजांच्या अष्टतीर्थ शाही स्नानाने झाली
श्री महाराजांचे अष्टतीर्थाचे शाही स्नानाचे समयी पुष्पवृष्टी व फटाक्यांची आतषबाजी कऱण्यात आली
श्री गुरुचरित्र सरामृत परायणाला शुक्रवारी दिनांक २६ डिसेंबर रोजी प्रारंभ झाला नित्य दिनक्रमात सकाळी श्री स्वामी महाराजांना राजोपचार अभिषेक तदनंतर नित्य दिनपाठ या मध्ये करुणात्रिपदी ,स्तवन मंजिरी, घोरकष्टउद्धारण स्तोत्र, नर्मदाष्टक,इ. समावेष आहे, नंतर गुरुमाई सौ यांच्या ओघवत्या वाणीतून श्री गुरूचरित्र सरामृत ग्रंथांचे वाचन,श्री स्वामींना माध्यान्ह भिक्षा व नैवेद्य आरती आणि महाप्रसाद
श्री स्वामींचा भिक्षारूपी महाप्रसाद निर्गुण मठ व संगमावर सर्व दत्त भक्तांना मध्यानी व सायंकाळी दोन्ही वेळा देण्यात येतो या मध्ये भाजी पोळी वरण भात भजी वडे एक पक्क्वान्न असा नित्य भिक्षेचा थाट आहे दुपारी ४ वाजे पासून श्री मकरंद माहाराज( मठाधिपती श्री क्षेत्र दत्तधाम परभणी)यांचे रसाळ आणि ओजस्वि वाणीतून श्री गुरुचरित्र कथामृत सांगितले जाते या मध्ये महाराज सांगतात भक्ती ही निकोप व श्रध्दायुक्त असली पाहिजे सर्व धर्माच्या जातीच्या लोकांना भगवंताची उपासना करण्याचा अधिकार आहे यामुळे समाज एक संघ होईल व समाज एक संग झाला तर राष्ट्र एक संघ राहील
कथामृतानंतर सहस्त्र दीपदर्शन सोहळा ,हरिपाठ, संगित नामजप हे कार्यक्रम आणि वेद मंत्रोच्चाराने दिवसाची सांगता होते.
या व्यतिरीक्त मंगळवारी कुंकुमार्चन सेवा,सौभाग्य अलंकार सेवा,कुमारिका पूजन,शतब्राम्हण भोजन,पठात्मक शतचंडी,विविध सिद्ध ग्रंथांचे पारायण जसे,ज्ञानेश्वरी दत्त माहात्म्य, इ.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे श्री गुरुचरित्र सारामृत ग्रंथाच्या इंग्रजी आवृत्तीचे श्री मकरंद महाराज व सौ गुरुमाई यांचे शुभहस्ते प्रकाशन झाले यानिमित्ताने हा ग्रंथ सातासमुद्रापार गेला ही स्वामींची कृपा
या भव्यदिव्य कार्यक्रमासाठी पुणे मुंबई हैद्राबाद बेंगरुळू संभाजीनगर,जालना, बीड,परभणी,नांदेड, औंढा, नाशिक,हिंगोली,वसमत,अहिल्या नगर,परळी लातूर,उदगीर आशा विविध शहरातून हजारो भाविक भक्त जमले आहेत
कार्यक्रमाची सांगता दिनांक ०२ जानेवारी रोजी महाप्रसादाने होत आहे सर्व परायणास बसलेल्या भक्तांना ग्रंथ प्रसाद रूपाने मिळणार आहे


























