पंढरपूर – येथील अध्यापक विद्यालय पंढरपूर मधील सर्व विद्यार्थ्यांनी नुकतीच क्षेत्र भेटीसाठी ऐतिहासिक वास्तू म्हणून सिद्धेश्वर मंदिर ,माचनूर आदी ठिकाणी भेटी देऊन तेथील सर्व माहिती जाणून घेतली.
अध्यापक विद्यालय पंढरपूर मध्ये नेहमीच विविध उपक्रम मोठ्या उत्साहाने घेतले जातात. अध्यापक विद्यालयाच्या विविध विषयाच्या अभ्यासक्रमांतर्गत विविध उपक्रम दिलेले आहेत. त्यापैकी शिक्षक व्यक्तिमत्व, तसेच इतर विषय या अंतर्गत शाळा भेट तसेच ऐतिहासिक स्थळांना भेटी त्यांचे अहवाल लेखन असे उपक्रम पूर्ण करण्यासाठी अध्यापक विद्यालय पंढरपूर येथील सर्व विद्यार्थी क्षेत्र भेटीसाठी ऐतिहासिक वास्तू म्हणून सिद्धेश्वर मंदिर ,माचनूर या ठिकाणी भेट दिली. तेथील सर्व माहिती जाणून घेतली
त्यानंतर दुसरी भेट पी.एम.श्री. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धापूर या ठिकाणी भेट देऊन त्या शाळेमधील असलेल्या भौतिक सोयी सुविधा,शाळेची गुणवत्ता, शाळेचा परिसर, शाळेतील विविध प्रयोगशाळा, शाळेतील विविध रजिस्टर यांचा अभ्यास मुलांनी करुन माहिती जाणून घेतली. या प्रसंगी मंगळवेढा पंचायत समिती शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी बिभीषण रणदिवे यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
आधुनिक तंत्रज्ञानावरती चालला जाणारा तसेच कमी कामगारांन वरती चालणारा साखर कारखाना म्हणून ज्या कारखान्याची ओळख आहे तो म्हणजे मंगळवेढा परिसरातील युटोपियन सहकारी साखर कारखाना, अशा कारखान्याला भेट दिली. तेथील सर्व तंत्रज्ञान माहिती मुलांनी जाणून घेतली.
या दौऱ्यात सर्व मुलांनी मंगळवेढा येथील प्रसिद्ध असे रिद्धीसिद्धी गणपती मंदिर या ठिकाणी सुद्धा भेट देऊन तेथील कलाकृतींचा आनंद घेतला . या क्षेत्रभेटी दौऱ्यामध्ये अध्यापक विद्यालयाचे सर्व विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक सहभागी झाले होते .
या क्षेत्रभेट दौऱ्यामध्ये मंदिराच्या ठिकाणी त्या मंदिराचे पुजारी तसेच ज्या शाळेमध्ये भेट देण्यासाठी गेलो त्या शाळेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक तसेच कारखान्याचे वरिष्ठ अधिकारी रविराज पाटील साहेब यांनी आमच्या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली. क्षेत्रभेट उपक्रमासाठी संस्थेचे मा.सचिव सु .र . पटवर्धन, संस्थेचे सदस्य एस.पी. कुलकर्णी यांचे मार्गदर्शन मिळाले तर कॉलेजचे प्राचार्य डॉ.एच.आर. वाघमारे यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
तसेच या क्षेत्रभेट कार्यासाठी संतोष गंगथडे ,श्रीनिवास हरिदास, सौ.पाटील, एच.डी.जाधव, मनोज पाडवी, अतुल शिखरे अभिजीत अवताडे तसेच संजय गोसावी यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी सर्व विद्यार्यांथ्यांनी देखीलशिस्तीचे पालन करीत क्षेत्रभेट यशस्वीरित्या पूर्ण केली.
























