सोलापूर – मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान अंतर्गत शासनाने ग्रामपंचायतीची थकीत कर वसुली करण्यासाठी करामध्ये ५० टक्के सवलत दिली आहे .
३१ डिसेंबर पर्यंत या योजनेचा कालावधी असल्याने शेवटच्या दिवशी अनेक नागरिकांनी थकित घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये गर्दी केल्याचे दिसून आले. अनेक वर्षापासून थकित कर वसूली झाल्याने शेवटच्या दिवशी ग्रामपंचायत मालामाल झाले .
थकीत कर भरल्यामुळे गावच्या विकासासाठी निधी खर्च करावा अशी कर भरणार्या नागरिकांमधून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे .
























