Thursday, July 2, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वाळू माफियांच्या वकिलावरील हल्ल्यानंतर महिन्याभरातच पोलिसावर प्राणघातक हल्ला

तरुण भारतbyतरुण भारत
January 3, 2026
in crime
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टेंभुर्णी : वाळू माफियांच्या वकिलावर झालेला जीवघेणा हल्ला, भारत नाना पाटील यांच्यावर भर चौकात ऑइल ओतण्याची घटना आणि आता थेट कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावरच जिवे ठार मारण्याचा प्रयत्न—या सलग घटनांमुळे टेंभुर्णी पोलीस ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या कार्यकाळात गुन्हेगारांचे मनोबल वाढले असल्याची चर्चा नागरिकांतून सुरू आहे.

डायल 112 वरून मदतीचा कॉल आल्यानंतर घटनास्थळी गेलेल्या टेंभुर्णी पोलीस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबल महेंद्र अशोक शेटे यांच्यावर जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना माढा तालुक्यातील आलेगाव बुद्रुक येथे घडली. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा, मारहाण व खुनाचा प्रयत्न या गंभीर कलमान्वये तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींच्या शोधासाठी दोन स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली आहेत.

टेंभुर्णी पोलिस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १ जानेवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजता पोलिस कॉन्स्टेबल शेटे हे डायल 112 ड्युटीवर कार्यरत असताना महादेव तुपसौंदर (रा. अकुंबे, ता. माढा) यांनी दोन इसमांनी मारहाण केल्याची माहिती देत स्वतःच्या जिवाला धोका असल्याचे सांगून पोलिस मदतीची मागणी केली होती. त्यानुसार शेटे तातडीने घटनास्थळी रवाना झाले.

आलेगाव बुद्रुक येथील भिमानगर रोडलगत कॉलर महादेव तुपसौंदर रस्त्यावर मिळून आले असताना, शेटे हे सरकारी गणवेशात त्यांच्याशी बोलत होते. त्याचवेळी ग्रे रंगाची विटारा ब्रिझा भरधाव वेगाने तेथे आली. गाडीतून उतरलेल्या तीन इसमांनी पोलिस गणवेश पाहताच, “तू इथे का आलास?” असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली. शेटे यांनी शासकीय कर्तव्य बजावण्यासाठी आलो असल्याचे सांगताच आरोपी अधिकच आक्रमक झाले.

तिघांनी एकत्रितपणे शेटे यांची गच्ची पकडून धक्काबुक्की करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महादेव तुपसौंदर यांनाही ढकलून देण्यात आले. आरोपींनी शेटे यांना खाली पाडून काठीने त्यांच्या उजव्या हातावर मारहाण केली. यावेळी एकाने दगडाने डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. वार चुकवतानाच दगड त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस लागल्याने शेटे यांना चक्कर येऊन ते खाली बसले.

इतक्यावरच न थांबता आरोपींपैकी एकाने,

“या पोलिसाला जिवंत सोडायचे नाही,”

असे म्हणत पुन्हा दगडाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरकारी गणवेशातील पोलिसावर होत असलेली मारहाण पाहून रस्त्यावरील नागरिकांनी गाड्या थांबवत तत्काळ हस्तक्षेप केला. नागरिकांच्या मदतीने पोलिस कॉन्स्टेबल शेटे यांची सुटका झाली. गर्दी वाढताच आरोपी आपली गाडी घेऊन घटनास्थळावरून फरार झाले.

जखमी पोलिस कॉन्स्टेबल शेटे यांच्यावर मार्स हॉस्पिटल, टेंभुर्णी येथे उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविंद्र रामचंद्र चंदनकर, रामचंद्र तुकाराम चंदनकर (दोघे रा. आलेगाव बुद्रुक, ता. माढा, जि. सोलापूर) तसेच रामचंद्र तुकाराम चंदनकर यांचा जावई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मदने करीत असून आरोपींच्या अटकेसाठी दोन पथके सक्रिय आहेत.

पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची प्रतिक्रिया

“कर्तव्य बजावत असताना पोलिसावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आरोपींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. त्यांना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई केली जाईल.”

2022 मधील वाळू माफियांचा हल्ला

२०२२ मध्ये गारआकोले गावात टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस देशमुख–माने व त्यांच्या सहकाऱ्यांवर वाळू माफियांनी वाहन घालण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेत पोलिसांच्या मोटरसायकलचे नुकसान झाले होते.

 पोलिस पथकावर दगडफेक

मारहाण प्रकरणाच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलिस पथकावर जमावाने हल्ला केला होता. पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे, पोलीस नाईक विनोद साठे यांच्यासह कर्मचाऱ्यांवर दगडफेक व धक्काबुक्की करण्यात आली होती. या प्रकरणी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आलेगाव बुद्रुकची ताजी घटना

कर्तव्य बजावत असताना पोलिस कॉन्स्टेबल महेंद्र शेटे यांच्यावर हल्ला होणे ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब असून यामुळे पोलीस दलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

राजकीय सवाल

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात आणि सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या जिल्ह्यात नेमके काय चालले आहे?” “अवघ्या एका महिन्यात दोन गंभीर घटना घडत असताना आता तरी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार का?” — असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Post Views: 61
Previous Post

पुष्पक ऑर्केस्ट्राबार वर कारवाई; ७० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, ५७ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त 

Next Post

राजराजेश्वरी शिक्षण संकुलाचे स्नेहसंमेलन उत्साहात

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

राजराजेश्वरी शिक्षण संकुलाचे स्नेहसंमेलन उत्साहात

ताज्या बातम्या

मनपा मुलांची केंद्र शाळा 9 मध्ये शालेय साहित्याचे वाटप

मनपा मुलांची केंद्र शाळा 9 मध्ये शालेय साहित्याचे वाटप

July 1, 2026
सोलापूर महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

सोलापूर महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

July 1, 2026
सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

July 1, 2026

वालचंद’चे वरिष्ठ लिपिक भगवान खुरगांवकर यांचा सन्मान 

July 1, 2026
“वालचंद कनिष्ठ महाविद्यालय अकरावी  प्रवेशोत्सव जल्लोषात संपन्न “

“वालचंद कनिष्ठ महाविद्यालय अकरावी  प्रवेशोत्सव जल्लोषात संपन्न “

July 1, 2026
डॉ. देशपांडे संघाचा हबीब संघावर  दिमाखदार विजय

डॉ. देशपांडे संघाचा हबीब संघावर  दिमाखदार विजय

July 1, 2026
पद्मशाली शिक्षण संस्था येथे विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

पद्मशाली शिक्षण संस्था येथे विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

July 1, 2026

महापालिका भंगार चोरी प्रकरणात मोठी कारवाई

July 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0952250

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697