सोलापूर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ (DBATU), लोणेरे यांच्यावतीने पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ फुटबॉल (पुरुष) स्पर्धा २०२५–२६ साठी निवड झालेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. या निवडीत भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय चे गौतम श्रीनिवास जोग याची विद्यापीठ संघात निवड झाली आहे.
आंतरविभागीय निवड चाचणी ३१ डिसेंबर २०२५ रोजी संजिवन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, पन्हाळा येथे पार पडली. निवड झालेला DBATU संघ ६ ते २६ जानेवारी २०२६ दरम्यान पारुल विद्यापीठ, वडोदरा येथे होणाऱ्या पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेत सहभाग घेणार आहे.
भारत-रत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सोलापूर येथील विद्यार्थी असलेल्या गौतम श्रीनिवास जोग याने निवड चाचणीत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विद्यापीठ पातळीवर स्थान मिळवले. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा रविंद्रजी गायकवाड़, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनिल देशमाने, विद्यापीठ प्रशासन व क्रीडा विभागाचे प्रो. अमित वडवेराव सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करण्यात येत आहे.


















