सोलापूर – प्रतिक राजकुमार हलमल्ली याने सोलापूर येथे झालेल्या रायसोनी रॅपिड रेटिंग स्पर्धेत भाग घेऊन,नऊ फेऱ्या मध्ये सात आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडूंशी लढत घेत
यशवंत उबाळे,रमेश पाटील, या खेळाडू सोबत विजय मिळवला तर संस्कृती सुतार हिच्याशी बरोबरी करत एकूण नऊ पैकी साडेपाच गुण मिळविले.या कामगिरी मुळे त्यास १४५२ असे आंतराष्ट्रीय रॅपिड गुणांकन प्राप्त झाले आहे.
तो सध्या प्रशांत पिसे व शरद नाईक सरांच्याकडे बुद्धिबळाचे मार्गदर्शन घेत असून आजी शैलजा मुरूमकर व आई गौरी हलमल्ली यांच्या विशेष प्रेरणेमुळे त्याने बुद्धिबळात प्रगती करीत असल्याचे आवर्जून सांगितले आहे

















