Monday, November 2, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शाकंभरीदेवी नवरात्र उत्सव : कुळधर्म, कुळाचारासाठी ६०  प्रकारच्या भाज्यांचा असतो समावेश

तरुण भारतbyतरुण भारत
January 3, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – शाकंभरी पौर्णिमे निमित्त कुळधर्म, कुळाचारासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या साठ भाज्यांची किंमत येथील बाजारात शुक्रवारी (ता.२) तब्बल १ हजार २५१ रुपये होती. येथील इंदिरागांधी भाजी मार्केट मध्ये शहरातील देवमारे कुटुंबियांकडून गेल्या चार पिढ्यांपासून या भाज्यांची विक्री केली जाते. पंढरपूरातील प्रामुख्याने ब्राम्हण तसेच लिंगायत समाजातील काही कुटुंबियांचे शाकंभरी देवी हे कुलदैवत असल्यामुळे या कुटुंबियांकडून दरवर्षी शाकंभरी पौर्णिमेला शाकंभरीच्या नवरात्रोत्सवाची सांगता होते. त्यामुळे या दिवशी घरात कुळधर्म, कुळाचार करण्याची पध्दत आहे. त्यासाठी या भाज्यांची आवर्जून त्यांच्याकडून खरेदी केली जाते.

भारताची दक्षिण काशी तथा  तिर्थक्षेत्र पंढरपूर येथे बनशंकरी म्हणजेच शाकंभरी नवरात्र उत्सव पुर्व परंपरेप्रमाणे अत्यंत उत्साहात साजरा केला जातो.  शाकंभरी देवीला  शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी तब्बल ६०  प्रकारच्या विविध भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो,  वैशिष्ठ म्हणजे सवाश्ण, ब्राम्हण, कुमारिका यांना रामप्रहरी सकाळी ६ वाजता म्हणजे घरमाशी उठायच्या आत देवीला नैवेद्य दाखवून भोजन द्यावे लागते, यामुळे शाकंभरी नवरात्र साजरा होणाऱ्या घरातील स्त्रियांना मध्यरात्रीच उठून स्वयंपाकाची तयारी करावी लागते,

पंढरपूर येथील परिचारक, कटेकर, पूजारी, आवताडे, ऐतवाडकर, सप्ताश्व ही घराणी शेकडो वर्षांच्या पूर्वजांच्या परंपरेनुसार शाकंभरी नवरात्र साजरा करतात. येथील लिंगायत वाणी समाजातील काही कुटुंबियांचे देखील शाकंभरी देवी हे कुलदैवत आहे. त्यांच्या घरातून देखील कुळधर्म, कुलाचार केला जात असतो त्यासाठी या भाज्यांची  आवश्यकता असते. या निमित्ताने कधीही न पाहिलेल्या दुर्मिळ अशा आयुर्वेदिक गुणांनी युक्त आरोग्यदायी फळभाज्या, पालेभाज्या पोटात जातात,

पंढरपूर येथील देवमारे कुटुंबीय खास देवीची सेवा म्हणून या दुर्मिळ भाज्या विक्रीसाठी उपलब्ध करुन देतात. विशेष म्हणजे  लातूर, पुणे आणि सोलापूर या तीन जिल्ह्यासह आजूबाजूच्या खेडेगावात रानोमाळ भटकत या भाज्या देवमारे कुटुंबियांकडून गोळा केल्या जातात, यासाठी त्यांना पाच ते सात दिवस लागतात. येथील देवमारे कुटुंबियातील गणपत महादेव देवमारे, राजाराम हरिभाऊ देवमारे, बसवेश्वर भगवान देवमारे, प्रवीण पांडूरंग देवमारे हे चौघे फिरून त्यांनी या दुर्मिळ भाज्या गोळा केल्या आहेत. देवमारे यांची ही चौथी पिढी आहे. 

दरम्यान कुळधर्म, कुळाचारासाठी येथील काही कुटुंबियांकडून नव्वद,शंभर तर काही कुटुंबियांकडून साठ भाज्यांची खरेदी करण्याची परंपरा आहे. पूर्वी प्रमाणे शंभर किंवा त्याहून अधिक भाज्या एकाचवेळी सध्या मिळत नाहीत. मात्र देवमारे कुटुंबिय अथक परिश्रम करुन विविध प्रकारच्या ६० ते ८० भाज्या उपलब्ध करुन देतात. या वर्षी देवमारे यांनी ८८ विविध प्रकारच्या भाज्या उपलब्ध करुन दिल्या आहेत. या भाज्यांमध्ये तब्बल पंचेचाळीस फळभाज्या तर बेचाळीस पालेभाज्यांचा समावेश आहे.   

पंढरपूर येथील शाकंभरी दैवत असलेली ही घराणी कर्नाटक राज्यातील बदामी येथे वर्षातून एकदा तरी दर्शनास जात असतात. ज्यांना बदामी येथे जाणे जमत नाही ते पंढरपूर तालुक्यातील भाळवणी याठिकाणी  असलेल्या शाकंभरी देवीच्या दर्शनास जातात.
————————


आठ दिवस फिरुन गोळा कराव्या लागतात भाज्या
देवीस शंभर किंवा साठ प्रकारच्या विविध भाज्यांचा नैवेद्य दाखवावा लागतो पण पंढरीतील देवमारे कुटुंबीय खास सेवा म्हणून आठ आठ दिवस फिरून या दुर्मिळ रानभाज्या गोळा करतात येथील इंदिरा गांधी भाजी मार्केट मध्ये एक सेट १ हजार २५१, रुपयांना मिळतो,या भाज्या खरेदी करण्यासाठी पहाटे पासुन गर्दी असते, उशीर झाला तर भाज्या संपून जातात.
————————
या भाज्यांचा असतो समावेश
शांकभरी निमित्त लागणाऱ्या भाज्यात कोहाळे, आवळा, केव डागर,काशी भोपळा,काळी कोयरी,काळ माशी गड्डा, शिंगोळी,चिंच, उंबर दिंडी, काळा माका, मुकणी, राजगिरा, तांदुळसा ,मुखणी, राजहंस,वासनी तेल, पाथर, कातमोडा, चिल,कडीपत्ता,मोहरी,माठ, काटेमार, कुजीर, कासुदा, अंबाडा, जवस,चुका,चाकवत,चुची, कपाळफुटी,जवस,सुपारी वेल, काड कुसुळा, तुरी,दुधनी,पडवळ,तोंडली, पटाडी शेंग, गोकर्ण शेंग,कवठ, बोर, केळी, कडे बळा, केळीफुल ,रताळी वेल, कामुळ्या, आळू, आळु गड्डा,पपई,हरभरा,गाजर, गाजरपाला, मेथी,काशी भोपळा, पुदिना, देशी टोमॅटो, हादगा फुल, हादगा शेंग, हादगा पाला, रान पावटा, शेवगापाला, शेवगा शेंगा, मुळापाला , मुळा , मुळा शेंगा,वांगी, दोडका, गवारी,भेंडी, घेवडा, पावटा,  दुधी भोपळा, वाळुक, कारले,कोबी, फ्लॉवर कोबी,गाजर, वाटाणा, शेपू, चिघळ,पालक,मिरची, करडा,घोळ,कोथींबीर, घोसावळे,चवळी,तुरी आदीं ८७ ते ८८ प्रकाराचा भाज्या गोळा केल्या  जातात.

Post Views: 89
Previous Post

अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे गोरडवाडी येथील फॉरेस्ट क्षेत्राला आग

Next Post

वीरशैव दिनदर्शिका चे प्रकाशन व महादेव मंदिरास टीव्ही संच भेट

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

वीरशैव दिनदर्शिका चे प्रकाशन व महादेव मंदिरास टीव्ही संच भेट

ताज्या बातम्या

५ नोव्हेंबरला अरण्यऋषी पद्मश्री मारुती चित्तमपल्ली ग्रंथालय उद्घाटन सोहळा आणि वेबसाइटचे लोकार्पण

५ नोव्हेंबरला अरण्यऋषी पद्मश्री मारुती चित्तमपल्ली ग्रंथालय उद्घाटन सोहळा आणि वेबसाइटचे लोकार्पण

November 2, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे चषक २०२६ क्रिकेट स्पर्धा थाटात संपन्न; ४०१६ क्रिकेट क्लब पंढरपूर ठरला विजेता

पालकमंत्री जयकुमार गोरे चषक २०२६ क्रिकेट स्पर्धा थाटात संपन्न; ४०१६ क्रिकेट क्लब पंढरपूर ठरला विजेता

November 2, 2026
प्रताप आसबे यांच्या रूपाने निर्भीड पत्रकार हरपला 

प्रताप आसबे यांच्या रूपाने निर्भीड पत्रकार हरपला 

November 2, 2026
स.शि.वसंतराव काळे सहयोग ओंकार शुगर कारखान्याचे मोफत साखर वाटप सुरु

स.शि.वसंतराव काळे सहयोग ओंकार शुगर कारखान्याचे मोफत साखर वाटप सुरु

November 2, 2026

विद्यार्थ्यांच्या उद्योजकीय स्वप्नांना मिळणार ‘उद्यमदीप’चे व्यासपीठ!

November 2, 2026

मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलेल्या दुष्काळी अग्रीम मदतीचे वितरण सुरू : आमदार समाधान आवताडे

November 2, 2026
27 डिसेंबरला माळी समाजाच्या उपवर-वधू परिचय मेळावा व सामूहिक विवाह सोहळा

27 डिसेंबरला माळी समाजाच्या उपवर-वधू परिचय मेळावा व सामूहिक विवाह सोहळा

November 2, 2026
सांगोला महाविद्यालयात राष्ट्रीय संकल्प व एकता दिवस उत्साहात

सांगोला महाविद्यालयात राष्ट्रीय संकल्प व एकता दिवस उत्साहात

November 2, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1457262

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!