अक्कलकोट – नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबर रोजी दारू नाही, दूध प्या असा दिव्य संदेश व्यसनाधीन जनतेला देऊन उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांनी अक्कलकोट शहरात हजारो लोकांना दूध पाजवून नूतन वर्ष स्वागत जल्लोष्यात साजरा करण्यास भाग पाडले. या स्तुत्य उपक्रमात हजारो जणांनी उत्सहफूर्त पणे सहभाग नोंदविला.
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणावर तरुण पिढी दारू व अन्य व्यसनांकडे वळत असल्याचे वास्तव समाजासमोर आहे. या गंभीर सामाजिक प्रश्नाला सकारात्मक दिशेने सामोरे जाण्यासाठी उत्तर पोलीस स्टेशनच्या वतीने दारू सोडा, दूध प्या हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मावळते आणि नवीन वर्ष या शुभ दिनी जनतेने विनाकारण पैसा खर्च करून व्यसनधीन बनत आपले संसार उध्वस्त करून घेत होते.
व्यसनधीन बनून देशोधडीला लागू नये म्हणून चक्क पाचशे लिटर दूध खरेदी करून पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांनी एक स्तुत्य उपक्रम अक्कलकोट शहरात राबविल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.


















