अक्कलकोट – मिलन कल्याणशेट्टी नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर शहरातील नागरी प्रश्न सोडवण्यासाठी एकच झपाटा सुरु केले असून नुकतेच अक्कलकोट येथील जलशुद्धीकरण केंद्र तसेच कुरनुर धरण येथील पंप हाऊस येथे भेटी देऊन मार्च अखेर पर्यंत शहरातील सर्व घरांना नळ कनेक्शन जोडणी करून शहरात रोज सुरळीत पाणी पुरवठा करण्याचे संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना आदेश दिली आहे.यामुळे मे पासून शहराला रोज सुरळीत पाणी पुरवठा होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘जल-सुरक्षित’ आणि ‘आत्मनिर्भर’ भारत बनवण्यासाठी केंद्र सरकारच्या अमृत २ योजनाची कामे अक्कलकोट शहरात सुरु आहे. सदर काम ठेकेदार ज्योती कंटरक्शन प्रोपा. विजय मुंडे यांना काम मिळाल्या असून या योजनेसाठी जी एस टी वगळून साठ कोटीं रुपये मंजूर आहे.४ ऑक्टोबर २०२४ ला कार्यरंभ आदेश दिले असून एप्रिल २०२६ पर्यंत मुदत आहे.अतिवृष्टी मुळे दोन महिने काम करता आले नाही. या कामाची युद्ध पातळी वर अहोरात्र काम करून मुदतीत सर्व कामे पूर्ण करावी. अन्यथा मुदतवाढ देणार नसल्याचा ठाम भूमिका नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी घेतले आहे. यामुळे मार्च अखेर पर्यंत सर्व पाणी पुरवठा काम पूर्ण होईल. मे पासून शहराला रोज पाणी पुरवठा होईल.
कुरनूर धरण ते अक्कलकोट पर्यंत १६ की मी अंतर आहे. यापैकी सध्याच्या घडीला ०८ की. मी.पाईप लाईन व खोदाई काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ०८ की.मी.कामे दोन महिन्यात पूर्ण करण्या बाबत ,जलशुद्धीकरण केंद्रचे ७० टक्के काम पूर्ण असून उर्वरित ३० टक्के काम बाकी आहे. सदर काम दोन महिन्यात पूर्ण करण्या बाबत, शहरात सर्वत्र खोदाई करून पाईप लाईनचे ६५ टक्के कामे पूर्ण असून दोन महिन्यात पूर्ण करणेबाबत, शहरात सर्व घराना नळ कनेक्शन जोडणीचे कामे तीन महिन्यात पूर्ण करणे बाबत, जलशुद्धिकरण केंद्र आवारात १४ लाख लिटर चे पाण्याची टाकी चे ८० टक्के काम पूर्ण असून दीड महिन्यात काम पूर्ण करणेबाबत, कमलाराजे उद्यान येथे पाच लाखाचे पाण्याची टाकीचे कामे ९० टक्के कामे पूर्ण असून सदर काम दीड महिन्यात पूर्ण करणेबाबत तसेच म्हाडा कॉलनीतील पाच लाख लिटरचे पाण्याची टाकी पूर्ण असून वितरण व्यवस्थाचे कामे ८० टक्के पूर्ण झाले असून वीस टक्के कामे दीड महिन्यात पूर्ण करण्याबाबत सूचना नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी पाहणी वेळी दिले आहे. या वेळी मंडल अध्यक्ष प्रदीप पाटील,नगरसेवक ऋतुराज राठोड,सुनिल सिध्दे,सुनील राठोड सह पाणी पुरवठा उपअभियंता मनोजकुमार ईश्वरकट्टी तसेच पाणीपुरवठा कर्मचारी उपस्थित होते.
वेताल चौक, मोरे वस्ती, जनता चाल भीम नगर येथील दोन लाख लिटरचे चे टाकी काम पूर्ण असून येथील पाणी पुरवठा सुरळीत चालू आहे.कालिका नगरचे पाण्याचं टाकीचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतासाठी शासनाकडे पाठविले आहे.मंजुरी नंतर काम सुरु करण्यात येईल.
– रमाकांत डाके मुख्याधिकारी नगर परिषद अक्कलकोट


















