श्रीपूर – समाजातील सर्वच क्षेत्रात स्थित्यंतर होत आहे . विशेषतः राजकारणात ते फार प्रकर्षाने जाणवते असे असले तरी आपल्याला जी भूमिका मिळते ती निष्ठेने व कर्तव्य भावनेने पार पाडणे हेच आपले कर्तव्य आहे यातच आपल्या राष्ट्रीय उन्नततेचा मार्ग लपलेला आहे . असे प्रतिपादन अकलुज येथिल प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ . एम . के . ईनमदार यांनी केले .
माळशिरस तालुका राष्ट्रीय साखर कामगार संघटनेचे माजी खजिनदार विठ्ठल देशपांडे यांनी अकलुज मधील प्रभाग १३ व १४ मधून नगर पंचायत निवडणुकीत विजयी झालेले स्वाती फुले मॅडम व नाना गलांडे यांच्या सत्कार सभारंभाचे आयोजन केले होते त्या प्रसंगी डॉ . ईनामदार बोलत होते .
याप्रसंगी स .म . साखर कारखान्याचे माजी संचालक भारत फुले , खंडागळेसर , देशमुख ,श्रीपूर येथिल मिलिंद कुलकर्णी , बाळासाहेब कमते , सुरेश पुराणिक , अभियंते स्वप्नील नागटिळक
‘पुढे बोलताना डॉ . ईनामदार म्हणाले की , आज राजकारणात काही खरे राहीले नाही अशी चर्चा असते परंतू आपण समाजासाठी काम करतो ही भावना ठेवून निष्ठेने काम करणे हे आपले कर्तव्य समजले पाहिजे . वास्तविक प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी हेच सुत्र अंमलात आणणे म्हणजेच राष्ट्रभक्ती आहे .
या प्रसंगी बाळासाहेब कमते , मिलिंद कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले .
उपस्थितांचे स्वागत विठ्ठल देशपांडे यांनी केले .
अकलुजचे नूतन न . प . सदस्य फुले मॅडम व नाना गलांडे यांचा सत्कार करताना डॉ . ईनामदार .

























