Thursday, August 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पुरस्कारासाठी मंद्रूप ग्रामपंचायतचा कामकाज खटाटोप

तरुण भारतbyतरुण भारत
January 5, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – मंद्रूप येथील ग्रामपंचायत वारंवार केवळ पुरस्कारासाठी काम करीत असल्याचे दिसून येत आहे. गावातील समस्यांकडे दुर्लक्ष करून पुरस्कार मिळवण्यासाठी ऑनलाईन माहिती भरणे व लाखो रुपये खर्च करून दर्शनी भागात त्याचे प्रदर्शन करणे यासाठीच ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासनाचा अट्टाहास दिसून येत आहे . त्यामुळे नागरिकांमधून ग्रामपंचायतच्या कामकाजाविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

     ऑनलाइन माहितीमुळेच यापूर्वी मंद्रूप ग्रामपंचायतीला माझी वसुंधरा स्पर्धेत दोन पुरस्कार मिळाले आहेत. यासाठी पावणेदोन कोटी रुपये बक्षीस हे मिळाले आहे. या पुरस्कारासाठी दाखवण्यात आलेल्या अनेक गोष्टी मंद्रूप मध्ये उपलब्ध नसतानाही गावाला पुरस्कार मिळाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्याच प्रकारे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानासाठी ग्रामपंचायत प्रशासन बोगस कारभार करीत असून बसस्थानक परिसरात कचरा पेटी बसवण्यात आली आहे .

केवळ ३०० मीटर परिसरात दहा ते पंधरा कचरापेटी दिसून येत आहेत, तर उर्वरित गावांमध्ये या कचरापेटींचा कुठेही पत्ताच लागत नाही . पुरस्कार देणाऱ्या समितीकडून या परिसराला भेट देण्यात येणार असल्याचे पाहून ग्रामपंचायतीने दर्शनी भागात कचरा संकलनासाठी हा खटाटोप केल्याचा दिसून येत आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयासमोर दररोज कचऱ्याचा ढीग पडत असताना त्या ठिकाणी कचऱ्याची पेटी लावण्याचा ग्रामपंचायत प्रशासनाला सुचले नाही. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.

याशिवाय अनेक ठिकाणी  हद्दवाढ भागांमध्ये मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग पडत असताना त्याचा विल्हेवाट लावण्याचा विचार ग्रामपंचायतकडे दिसून येत नाही. मात्र पुरस्कारासाठी बस स्थानक परिसरात दर्शनी भागात लाखो रुपये खर्च करून कचरापेटी लावण्यात आली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला नागरीकांच्या विकासापेक्षा पुरस्कार महत्त्वाचे असल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे .
….


नागरीकांना पुरस्काराचे महत्व नाही
….
पुरस्कार समिती गावात प्रवेश करताना बसस्थानक परीसराला भेट देऊन येत असल्याने ग्रामपंचायतीने पुरस्कार मिळविण्यासाठी एका महिन्यात तीन वेळा स्वच्छता मोहीम राबविली आहे. त्याच ठिकाणी कचरापेटी बसविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. समितीही इतर परीसराला भेट देण्याऐवजी याठिकाणी पाहणी करून पुरस्कारासाठी शिफारस करीत आहे. त्यामुळे गावातील नागरीकांना पुरस्काराचे महत्व वाटत नाही.
….


सिईओंकडूनही नाराजी
…
जिल्हा परिषदेचे सिईओ कुलदीप जंगम यांनी मंद्रूपच्या अस्वच्छतेविषयी नाराजी व्यक्त केली आहे. बसस्थानक परीसर वगळता इतर गावाना जोडणार्‍या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून येते. ग्रामपंचायत दुजाभाव करून याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे.
….


मदत नको, विकास हवा
…
मंद्रूप ग्रामपंचायत नागरीकांच्या मूलभूत सोईसुविधांकडे दुर्लक्ष करून सायकल , भांडी व खुर्च्या वाटप करणे. कचरा पेटी लावणे, यासारख्या गोष्टींमधून विकासनिधी खर्ची टाकण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे मदत नको, विकास हवा , अशि मागणी नागरीकांमधून होत आहे.
…. 

१) बसस्थानक परीसरातील कचरापेटी

२) ग्रामपंचायत कार्यालयासमोरील कचरा 

Post Views: 149
Previous Post

वीरतपस्वी शिक्षण संकुल येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

Next Post

मिळालेली भूमिका निष्ठेने पार पाडणे हेच कर्तव्य

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

मिळालेली भूमिका निष्ठेने पार पाडणे हेच कर्तव्य

ताज्या बातम्या

सोलापूर तरुण भारत Short Updates 11

August 5, 2026
नेताजी शिक्षण संकुलास क्रीडा उपसंचालक नाईक यांची सदिच्छा भेट

नेताजी शिक्षण संकुलास क्रीडा उपसंचालक नाईक यांची सदिच्छा भेट

August 5, 2026
तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत श्री शंकरलिंग प्रशालेस घवघवीत यश 

तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत श्री शंकरलिंग प्रशालेस घवघवीत यश 

August 5, 2026

शहीद पोचिराम  कांबळे यांच्या स्मृतीदिन निमित्य वही वाटप

August 5, 2026
आषाढ महिन्यानिमित्त श्री मरीमातेची गाव जत्रा भक्तिमय वातावरणात सागरी

आषाढ महिन्यानिमित्त श्री मरीमातेची गाव जत्रा भक्तिमय वातावरणात सागरी

August 5, 2026
पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेतील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना तातडीने बक्षीस रक्कम द्या

पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेतील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना तातडीने बक्षीस रक्कम द्या

August 5, 2026
हॉटेल असोसिएशन बार्शीच्यावतीने नूतन आमदार राजेंद्र राऊत यांचा सत्कार

हॉटेल असोसिएशन बार्शीच्यावतीने नूतन आमदार राजेंद्र राऊत यांचा सत्कार

August 5, 2026
टेंभू-म्हैसाळचे पाणी माण नदीत आणण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध

टेंभू-म्हैसाळचे पाणी माण नदीत आणण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध

August 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1029689

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!