Wednesday, September 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भाजपाच्या तेजस्विनी कथले यांनी शक्ती प्रदर्शन करत वाजत गाजत नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला

तरुण भारतbyतरुण भारत
January 6, 2026
in marathwada
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – नगरपरिषदेच्या भाजपच्या नूतन  नगराध्यक्षा तेजस्विनी कथले यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत मिरवणुकीद्वारे वाजत गाजत जाऊन नगरपालिका मुख्यालयात नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.

सकाळी अकरा वाजता कथले यांच्या निवासस्थानापासून शेकडो नागरिक आणि भाजप कार्यकर्ते तसेच नगरसेवकांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. लेझीम, ढोल ताशे, संबळ अन हलगी अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात मुख्य मार्गाने ही मिरवणूक पालिकेजवळ आली. शिवसृष्टीमधील शिवरायांचा पुतळा, ग्रामदैवत श्री भगवंतांचे दर्शन घेऊन माजी आमदार राजेंद्र राऊत, कविता राऊत, पती प्रशांत कथले, कुटूंबिय, नातेवाईक आणि नगरसेवक यांच्या उपस्थितीत सन्मानाने तेजस्वी कथले यांनी  पदभार स्वीकारला.

त्यानंतर नगरपालिका आवारात छोटेखानी कार्यक्रमात सर्व नगरसेवक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार राजेंद्र राऊत, मुख्याधिकारी तैमूर मुलाणी, बाजार समिती सभापती विजय गरड, भाजप शहराध्यक्ष महावीर कदम, तालुकाध्यक्ष मदन दराडे, गडदे, सेनेचे तालुकाप्रमुख विजय माने आदींसह नगरसेवक उपस्थित होते.

मुख्याधिकारी तैमूर मुलाणी यांनी प्रस्ताविकात सर्वांचे स्वागत करत प्रशासन आणि पदाधिकारी हातात हात घालून शहराचा विकास करु, अशी ग्वाही देत नूतन नगरसेवक आणि नगराध्यक्षा यांना शुभेच्छा दिल्या. उपमुख्याधिकारी विठ्ठल पाटोळे, राजाराम नरुटे, नगर अभियंता आणि सर्व खाते प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. नगरपालिका सभागृह,नगराध्यक्ष दालन यांची फुलांनी सजावट करण्यात आली होती.

नूतन नगराध्यक्ष तेजस्विनी कथले म्हणाल्या, मी शहराची प्रथम सेवक आहे. प्रशासन आणि विरोधक यात समन्वय राखत हेवा वाटेल असा कारभार करु. देवभाऊ, जयाभाऊ अन राजाभाऊ हे तीन लाडके भाऊ शहरासाठी निधी कमी पडू देणार नाहीत. पाणी प्रश्न एप्रिलपर्यत मार्गी लावेन. माझे कार्यालय हे सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहील. जिल्ह्याला हेवा वाटेल असे स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित शहर बनवू, असे अभिवचन दिले.

माजी आमदार राजाभाऊ राऊत म्हणाले, तालुक्यात विकासाची थांबलेली घोडदौड पुन्हा सुरु होईल. तालुका पाठीमागे गेला अशी लोकांना भीती वाटत होती. काहीजणांनी तालुक्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता. राजकारणात काहीही होऊ द्या, कोण येईल कोण जाईल पण आपण ज्या गावात जन्मलो आणि वास्तव्य  आहोत अशा आपल्या गावाची बदनामी होईल असे पाप कुणीही करु नका. चार वर्षे प्रशासक कारकीर्द होती. त्यामुळे एकट्या सीईओंना काम करताना अडचणी निर्माण झाल्या. नगरपालिकेत आर्थिक तुटवडा तयार झाला आहे. २५ कोटी अनुदान जुनी देणी देण्यासाठी सरकारकडून  मंजूर होईल. निधी आणण्यात आपण एक्स्पर्ट आहोत. शहरवासियांनी काळजी करण्याचे कारण नाही. ३२ नगरसेवक विजयी होतील, अशी  अपेक्षा होती. थोड्या जागा कमी आल्या. पराभूत झाला असला तरी तुम्ही नगरसेवक आहेत, लोकांत जावा. त्यांची कामे करा.

विरोधकांना उद्देशून राऊत म्हणाले, तुम्हाला आयुष्यात गुलाल पडू देणार नाही. जरा मोठं मन करा की, आज विरोधी नगरसेवक आले नाहीत. त्यांचा काहीतरी कुटील डाव सुरु होता. जाणीवपूर्वक कटकारस्थान आणि बदनामी आम्ही सहन करणार नाही. आम्हाला काय घेरणार, आमच्या मनात कुणाविषयी काही नाही. प्लॅनिंग करुन अडचण करण्याचा प्रयत्न करु नका, आम्ही सक्षम आहोत. 

कोणी आपणास नावं ठेवणार नाही असा कारभार करा. हारतुरे स्वीकारताना आपल्याला ज्यांनी सहकार्य केले त्यांना फक्त विसरु नका. माझी हात जोडून विनंती आहे. कारण  जिवाभावाचे सोबती महत्वाचे. सर्वांचा तुम्ही सन्मान करा, लोकांसोबत आपुलकी ठेवा, उज्वल कारकीर्द होईल अशा शुभेच्छा दिल्या. 

Post Views: 75
Previous Post

नागणसूरच्या प्रचंडे प्रशालेत आनंद मेळावा उत्साहात संपन्न

Next Post

पत्रकार दिनानिमित्त रोहित धोत्रे यूथ फाउंडेशन व आर.डी. ग्रुपच्या वतीने पत्रकारांचा सत्कार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

पत्रकार दिनानिमित्त रोहित धोत्रे यूथ फाउंडेशन व आर.डी. ग्रुपच्या वतीने पत्रकारांचा सत्कार

ताज्या बातम्या

दुःख सांगत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात फोडला हंबरडा #viral #news #marathinews

September 23, 2026
सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलात श्री गणेशाला भावपूर्ण निरोप

सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलात श्री गणेशाला भावपूर्ण निरोप

September 23, 2026
महापालिका , मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचा संयुक्त उपक्रम

महापालिका , मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचा संयुक्त उपक्रम

September 23, 2026
बाळीवेस शक्तिपूजा समाजसेवा मंडळाच्या अध्यक्षपदी थोबडे

बाळीवेस शक्तिपूजा समाजसेवा मंडळाच्या अध्यक्षपदी थोबडे

September 23, 2026
स्वामी विवेकानंद पोलीस पब्लिक स्कूल मधील (U-14) मुली रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये यश

स्वामी विवेकानंद पोलीस पब्लिक स्कूल मधील (U-14) मुली रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये यश

September 23, 2026
तायक्वांदो स्पर्धेत एमआयटीच्या सूर्यतेज पाटीलची जिल्हास्तरावर निवड

तायक्वांदो स्पर्धेत एमआयटीच्या सूर्यतेज पाटीलची जिल्हास्तरावर निवड

September 23, 2026
सामंजस्यामध्ये समाजातीलच नव्हे तर जगातील प्रश्न सोडविण्याची शक्ती : ॲड. मिलिंद थोबडे 

सामंजस्यामध्ये समाजातीलच नव्हे तर जगातील प्रश्न सोडविण्याची शक्ती : ॲड. मिलिंद थोबडे 

September 23, 2026
इंडियन मॉडेल स्कुल स्टेट बोर्ड चे स्केटींगमध्ये यश

इंडियन मॉडेल स्कुल स्टेट बोर्ड चे स्केटींगमध्ये यश

September 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1248792

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!