जेऊर – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा करमाळा या शाखेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती संभाजी ब्रिगेड कार्यालय करमाळा येथे साजरी करण्यात आली. यावेळी प्राध्यापक शिवाजी दळवी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे .संघर्षमय जीवन या विषयी भाष्य करतेवेळी ” फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का “असे उद्गार व्यक्त केले .
यावेळी सावित्रीबाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.नंतर करमाळा अंनिस. शाखेचे मार्गदर्शक यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे मा. प्राचार्य नागेश माने. सोलापूर जिल्हा अंनिस.शाखेचे प्रधान सचिव अनिल माने, लक्ष्मण लष्कर सर यांनी विचार व्यक्त केले.
यावेळी करमाळा तालुका अंनिस. शाखेचे कार्याध्यक्ष दिगंबर साळुंके बापू, संतोष कांबळे तालुका सचिव संजय हंडे , राजेंद्र साने, सुनील गायकवाड, कालिदास घरबुडे, अनिल बारबोले, सागर माने ,गणेश बनकर आदि जण उपस्थित होते.


















