सोलापूर – महापालिका निवडणुक २०२५ च्या पार्श्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर व सोलापूर ग्रामिण पोलिस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत अवैध हातभट्टी दारु निर्मिती केंद्रावर केलेल्या धडक कारवाईत रूपये ०६ लाख ७१ हजार ९१५ चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राज्य ‘उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर यांनी सागर धोमकर विभागीय उपायुक्त, पुणे विभाग याच्या निर्देशानुसार व भाग्यश्री पं. जाधव, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर. सोलपूर ग्रामिण पोलिस विभागाचे परिविक्षाधिन आय पी एस अधिकारी पी एस राहुल, जे. एन. पाटील प्र.उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर यांचे समवेत दि. १२/०१/२०२६ रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे मुळेगाव तांडा, येथे केलेल्या अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रांवर, केलेल्या धडक कारवाईत एकुण ०८ गुन्हे नोंद करण्यात आले असुन ०८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाईत १०,४२० लि. रसायन, ११७० लि. हा. भ. दारू ५१०० किलोग्राम काळा गुळासह एकुण रूपये ०६लाख ७१ हजार लाख ९१५ चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच या विभागाकडून ०१ जानेवारी २०२६ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत एकूण ९९ गुन्हे दाखल करण्यात आले असून ९८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच सदर कारवाईत ४४,५९० लि. रसायन, ३९७३ लि. हा. भ. दारू ३९९ ब. ली. देशी मद्य, ५३ ब. ली. विदेशी मद्य, ११७ ब.ली. परराज्यातील विदेशी मद्य, २१ ब.ली. बिअर, ६३५ ली. ताडी २२०० किलो मळी, ५१०० किलोग्राम काळा गुळ व ०५ वाहनांसह रुपये ३६ लाख ८७हजार ४१५ चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई प्र.उपअधीक्षक जे.एन. पाटील, निरीक्षक आर.एम. चवरे, ओ व्ही घाटगे, डी आर बामणे तसेच दुय्यम निरीक्षक सर्वश्री एस.डी. कांबळे, राम निंबाळकर, धनाजी पोवार, आर.एम. कोलते, सुखदेव सिद, सचिन शिंदे समाधान शेळके, दिलीप सानप, अभिजित साळुंखे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, संजय चव्हाण, जवान सर्वश्री चेतन व्हनगुंटी, आण्णा करचे, नंदकुमार वेळापूरे, वसंत राठोड, प्रशांत इंगोले, अनिल पांढरे, विनायक काळे, कपिल स्वामी गजानन ढब्बे, तानाजी जाधव, पवन उगले, स्वप्निल आरमाळ, योगेश गाडेकर, पंढरीनाथ भुतेकर, मंगेश मारसिंग, महिला जवान शिवानी मुढे, वाहनचालक दिपाली सलगर, संजय नवले, रशीद शेख व दिपक वाघमारे यांनी पार पाडली.



















