अक्कलकोट – येथे लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जवाहर नवोदय विद्यालय लातूर येथे अनुष्का पाटोळे ह्या विद्यार्थीनीचा खून करून संशयीतरित्या आत्महत्या दाखवण्यात आले असून महाराष्ट्रभर इतके मोर्चा आंदोलने होऊनही मारेकर्याविरुद्ध कोणतेच ठोस कारवाई दिसून येत नसल्याने येत्या आठ दिवसांमध्ये जर योग्य कारवाई नाही झाल्यास अक्कलकोट मध्ये भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा वजा निवेदन तहसीदार विनायक मगर यांना देण्यात आले.
यावेळी समाज अध्यक्ष निवृत्ती पारखे,जिल्हाध्यक्ष नागेश जाधव, तालुकाध्यक्ष बाबाजी कांबळे, संपर्कप्रमुख अनिल शितोळे, शहराध्यक्ष उल्हास क्षीरसागर, अंबादास कांबळे,सुभाष रणदिवे, गणेश महापुरे,हर्षवर्धन देडे,नागेश गायकवाड व समाज सचिव ज्योतिबा पारखे आदि समाजबांधव उपस्थित होते.
























