Thursday, July 2, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सुलाखे कॉमर्स कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन

तरुण भारतbyतरुण भारत
January 18, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
123
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर आणि श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत मौजे कासारवाडी येथे आयोजित सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिराचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले.

 ‘शाश्वत विकासाच्या दिशेने युवकांची भूमिका- जलसंधारण व्यवस्थापन व पडीक जमीन विकास’ या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर हे शिबीर दि. १७ ते २३ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.

प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. एम. ए. ढगे यांनी केले. आपल्या मनोगतात त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व विशद करताना, विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक प्रगतीपुरते मर्यादित न राहता समाज आणि राष्ट्राच्या उभारणीसाठी कार्य करावे, असे आवाहन केले. स्वतःच्या सर्वांगीण विकासाबरोबरच समाजासाठी योगदान देणे हेच खरे शिक्षण असल्याचे त्यांनी ठासून सांगितले.

शिबिराचे उद्घाटन प्रा. के. बी. चपटे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांनी शिस्त, संघभावना आणि सेवाभाव जपत गावाच्या विकासासाठी काम करावे, असे स्पष्ट केले. राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ एक उपक्रम नसून ती विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारी चळवळ असल्याचे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षस्थानी डॉ. बी. डी. लांडे हे होते. त्यांनी विद्यार्थ्यांनी शिबिराच्या माध्यमातून गावात जाऊन लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवावा आणि आपल्या कार्याचा ठसा उमटवावा, असे आवाहन केले. युवकांच्या ऊर्जेचा योग्य दिशेने वापर झाला तर देशाचा शाश्वत विकास निश्चित साध्य होऊ शकतो, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

या कार्यक्रमास मौजे कासारवाडीच्या सरपंच यांचे प्रनिधी  नितीन मंडलिक उपस्थित होते. त्यांनी शिबीर काळात गावाकडून सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली.

या समारंभास बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजचे सीनियर व ज्युनिअर विभागातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे एकूण १०० स्वयंसेवक या शिबिरात सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी प्रा. के. एम. माळी यांनी तर आभार प्रा. एन. आर. सारफळे यांनी मानले.

या सात दिवसांच्या शिबिरामध्ये जलसंधारण, पडीक जमीन विकास, स्वच्छता, जनजागृती व सामाजिक बांधिलकी जोपासणारे विविध उपक्रम राबविण्यात येणार असून या माध्यमातून युवकांमध्ये राष्ट्रनिर्माणाची जाणीव अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Post Views: 169
Previous Post

सदाशिव चौगुलेनी केलेले प्रयोग व वापरलेले तंत्रज्ञान यश व प्रेरणा देणारे; डाळिंबरत्न भागवत पवार यांचे प्रतिपादन

Next Post

जुन्या रूढींना मूठमाती; सुवासिनी अन् विधवा भगिनींचा एकत्र ‘हळदी-कुंकू’ सोहळा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

जुन्या रूढींना मूठमाती; सुवासिनी अन् विधवा भगिनींचा एकत्र 'हळदी-कुंकू' सोहळा

ताज्या बातम्या

मनपा मुलांची केंद्र शाळा 9 मध्ये शालेय साहित्याचे वाटप

मनपा मुलांची केंद्र शाळा 9 मध्ये शालेय साहित्याचे वाटप

July 1, 2026
सोलापूर महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

सोलापूर महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

July 1, 2026
सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

July 1, 2026

वालचंद’चे वरिष्ठ लिपिक भगवान खुरगांवकर यांचा सन्मान 

July 1, 2026
“वालचंद कनिष्ठ महाविद्यालय अकरावी  प्रवेशोत्सव जल्लोषात संपन्न “

“वालचंद कनिष्ठ महाविद्यालय अकरावी  प्रवेशोत्सव जल्लोषात संपन्न “

July 1, 2026
डॉ. देशपांडे संघाचा हबीब संघावर  दिमाखदार विजय

डॉ. देशपांडे संघाचा हबीब संघावर  दिमाखदार विजय

July 1, 2026
पद्मशाली शिक्षण संस्था येथे विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

पद्मशाली शिक्षण संस्था येथे विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

July 1, 2026

महापालिका भंगार चोरी प्रकरणात मोठी कारवाई

July 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0952332

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697