Thursday, July 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जयभवानी सामजिक व सांस्कृतिक संस्था व अहिल्यानगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने नगरसेवक महेश इंगळे यांचा सन्मान

तरुण भारतbyतरुण भारत
January 18, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट – येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील जय भवानी सामजिक व सांस्कृतिक संस्था व अहिल्यानगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत येवला ते अक्कलकोट सायकल यात्रेचे सायकल स्वार यात्रेकरु येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात येऊन स्वामीं चरणी नतमस्तक झाले. यावेळी सायकल यात्रेतील सातारा न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. विक्रम आव्हाड, सातारा येथील ९ व्या न्यायालयाच्या न्यायाधीश डॉ.संगीता आव्हाड, संस्थेचे अध्यक्ष विजय भोरकडे, गणेश भोरकडे आदींसह विविध क्षेत्रातील सायकल स्वारांचा श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांनी श्री.स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद देवून यथोचित सत्कार केला. 

       याप्रसंगी मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे हे अक्कलकोट नगरपालिका निवडणुकीत सलग पाच वेळा निवडून आल्याबद्दल व गेल्या २० वर्षापासून आपल्या या सायकल स्वारांना विशेष सहकार्य करीत असल्याबद्दल 

पिंपळगाव जय भवानी सामजिक व सांस्कृतिक संस्था व अहिल्यानगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने न्यायमुर्ती डॉ. विक्रम आव्हाड यांनी नगरसेवक महेश इंगळे यांचा संस्थेचे सन्मानचिन्ह देवून विशेष सत्कार केला.

यावेळी जावळी तालुका जिल्हा रेल्वे विभागाचे नवनाथ भोरकडे, औषध निर्माण अधिकारी रोहित पाटील, सेवा निवृत्त सेना अधिकारी युवराज गांगवे, समीर आव्हाड, अजित सैंदर, आयटी इंजिनियर प्रभाकर डुंबरे, प्रदीप हांडोरे, करनिर्धार तथा प्रशासकीय अधिकारी सागर झावरे, पैठणी क्षेत्रातील किशोर खोकले, बाळासाहेब बनकर, साईनाथ गायकवाड, उद्योजक नितीन कोकाटे, गणेश मोरे, गोरख घोटेकर, सेवा निवृत्त शिक्षक- शिक्षिका, कानवडे दांपत्य, अक्षय बनकर, अभिषेक मढे, रेवणनाथ ठाकरे, वैभव मोरे, नागेश सैंदर, नवनाथ (चिट्टी) भोरकडे, अरुण हांडोर, कैलास श्रीमंत, गौरव हांडोर, अर्जुन देवरे, रामनाथ मोरे हे सहभागी सायकल स्वार उपस्थित होते. 

(चौकट – जीवन जगत असतांना बऱ्याच वेळा कळत न कळत आपल्या हातून कायद्याचा भंग होतो आणि कायद्याची सर्व सामान्याना माहिती नसल्याने न्यायालायचे द्वार ठोठावे लागते असे होऊ नये यासाठी तसेच जर असा प्रसंग ओढवलाच तर विधी सेवा प्राधिकरणा मार्फत सर्व सामान्य जनतेला कायद्याच्या चौकटीत राहून कशी व कोणती मदत मिळू शकते याबाबतची जनजागृती व श्री स्वामी दर्शनाचा संकल्प या सायकल यात्रे दरम्यान पुर्ण केलेली आहे – न्यायमुर्ती 

डॉ.विक्रम आव्हाड, जिल्हा न्यायालय, सातारा)

…………………………………………….

(चौकट – सायकल यात्रेचे यंदा २० वे वर्ष आहे. गेल्या २० वर्षा पासुन सातत्याने विविध सामाजिक संदेश देणाऱ्या सायकल यात्रेचे प्रस्थान दि. ११ जानेवारी रोजी येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथून अत्यंत उत्साहात झाले. येवला-तुळजापूर-अक्कलकोट असा ५६५ किमी सायकल प्रवास करीत असताना ठीक ठिकाणी शाळा, महाविद्यालय व न्यायालय परिसरात कायदेविषक मार्गदर्शन शिबिर, बालविवाह प्रतिबंध कायदा २००६, गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम ( एनडीपीएस) १९८५, 

विधी सेवा अधिनियम १९८७ बाबत 

जनसामन्यात जनजागृती, निसर्ग जोपासना व संवर्धन, पर्यावरणचा होणारा ऱ्हास, सायकलचा जास्तीत जास्त वापर म्हणजे प्रदूषणाला आळा, पतंग नायलॉन मांजाचा वापरास प्रतिबंध इत्यादी विषयासंदर्भात जन जागृतीस्पर माहिती फलक या सायकल यात्रेत सायकलला लावून जनजागृती करण्यात आली आहे. 

सायकल स्वारीतील जनजागृती सुचना फलकांच्या माध्यमातून नागरीक नक्कीच बोध घेतील अशी अपेक्षा – विजय भोरकडे, अध्यक्ष, जय भवानी सामजिक व सांस्कृतिक संस्था पिंपळगांव-जलाल)

विशेष बातमी – संकलन – श्रीशैल गवंडी (श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान, अक्कलकोट)

Post Views: 80
Previous Post

करकंब उंबरे करोळे रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा

Next Post

अक्कलकोटला निघाले, वाटेत काळाचा घाला; पनवेलमधील 5 भाविकांचा मृत्यू

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

अक्कलकोटला निघाले, वाटेत काळाचा घाला; पनवेलमधील 5 भाविकांचा मृत्यू

ताज्या बातम्या

शिक्षक हेच समाजाचे खरे शिल्पकार -डॉ वडकबाळकर

July 29, 2026

सराफ बाजारात दुकानात घुसखोरी करून कामगाराला मारहाण व तोडफोड

July 29, 2026

८ पर्यावरणपूरक दाहिन्यांवर वर्षाला १.३० कोटींचा खर्च

July 29, 2026
स्पर्धा परीक्षा ही एकदिवसीय नव्हे, तर सातत्याची कसोटी : संपदा वांगे

स्पर्धा परीक्षा ही एकदिवसीय नव्हे, तर सातत्याची कसोटी : संपदा वांगे

July 29, 2026

स्वामी समर्थ मंदिर परिसराचा कॉरिडॉरच्या धर्तीवर विकास; आमदार कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्याला यश, म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

July 29, 2026

वीजबिलमुक्त’ पाणीपुरवठ्याकडे जिल्हा परिषदेची वाटचाल

July 29, 2026
ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याची जागतिक भरारी; फ्रान्समधील EDRLab मध्ये लाखो रुपयांच्या पॅकेजवर निवड

ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याची जागतिक भरारी; फ्रान्समधील EDRLab मध्ये लाखो रुपयांच्या पॅकेजवर निवड

July 29, 2026

दूध व्यवसायासाठी सुवर्णसंधी; मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत लाखोंचे अनुदान

July 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1011498

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!