पंढरपूर – तालुक्यातील तिसंगी या गावात झालेल्या जबरी दरोड्यातील आरोपीला जेरबंद करून सोने, चांदी रोख एक लाख रुपये जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
तिरंगी येथे १२नोव्हेंबर २०२५ रोजी हा दरोडा टाकण्यात आला होता. फिर्यादीचे स्वतःचे तिसंगी या गावी सोन्याचे दुकान असुन तो दुकाना मध्ये झोपलेला असताना दुकानाचे शटर तोडुन दुकाना मध्ये घुसुन चार अनोळखी इसमांनी ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने, ०२ किलो चांदीचे दागीने व एक लाख रूपये रोख रक्कम असे फिर्यादीस मारहाण करून चोरून नेले असा गुन्हा दाखल झाला होता.
पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी ,अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे यांचे सुचनेनुसार व पंढरपुर शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे, यांच्या मार्गदर्शनाखाली “गुन्हे प्रकटीकरण” शाखेचे अधिकारी व अंमलदार यांची विशेष पथके नेमुन पंढरपुर शहर व परिसरातील तसेच घटनास्थळ निरीक्षण करून व त्यावर बारकाईने लक्ष ठेवले असता अशी गोपनिय माहिती मिळाली की, दोन ते तीन इसम हे गुन्हा घडण्याचे पुर्वी दोन ते तीन वेळा येवुन गेले आहेत. तेव्हा त्याबाबत गोपनिय माहिती काढुन त्यातील एक आरोपी हा सध्या त्याचे राहते घरी (देवापुर, पोस्ट म्हसवड ता. माण ,जि. सातारा )येथे आहे अशी माहिती मिळताच त्या ठिकाणी सापळा रचुन विक्रम आनंदा बाबर या आरोपीस ताब्यात घेतले.यावेळी चौकशी वेळी त्याचे आणखी तीन साथीदार यांचे सह गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, सहा. पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, प्रसाद औटी, पवार, कृष्णा पकाले,कपिल माने, शहाजी मंडले, बजरंग बिचुकले, दिपक नवले, हर्षद ठाकर यांनी पार पाडली.


















