सोलापूर : पूर्व भागातील पद्मशाली पुरोहित संघ वेदपाठशाळेचा 91 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
वर्धापनदिनानिमित्त संघाच्यावतीने समाजात एकोपा नांदून सर्वांनी आनंदाने राहण्यासाठी संकल्प करून नवग्रह पूजा, होमहवन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना उत्तम ज्ञान प्राप्ती साठी व प्रज्ञाविवर्धनासठी सरस्वती यज्ञ करण्यात आले. याशिवाय खाऊ वाटपाचा कार्यक्रमदेखील झाला.
कार्यक्रमाचे पौरोहित्य ब्रह्मश्री प्रभाकर गाजर्ला, सतीश पोला, राजू कोडम यांनी केले.
कार्यक्रमाचे यजमानपद अध्यक्ष ब्रह्मश्री श्रीनिवास म्याडम यांनी भुषविले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सचिव ब्रह्मश्री आत्माराम चिप्पा आणि सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. संघाचे विश्वस्त वेणूगोपाळ म्याना, श्रीनिवास गाजूल, नरेंद्र श्रीमल आणि इतर मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.
कार्यक्रमाच्या दिवशी शेकडो पुरोहितांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवून आपल्या पौरोहित्य परंपरा वृध्दिंगत होवून समाजात धर्म, परंपरा, धार्मिक, अध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करत धर्मकर्तव्य यथायोग्य करण्याचा निश्चय केला. संघाच्यावतीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ब्रह्मश्री हरी नल्ला, राघवेंद्र आरकाल, मनोहर जडल, नागदेव म्याना, नागशय्या वग्गू, भानुचंद्र चिप्पा यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन ब्रह्मश्री हरी नल्ला यांनी केले. सहसचिव व्यंकटेश श्रीनिवास जिल्ला यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी पुरोहित अविनाश श्रीमल, नागेश अंकम, व्यंकटेश वग्गू यांनी परिश्रम घेतले.
















