पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील पिलीव अकलूज रस्त्यावर झिंजेवस्ती हद्दीत [65 फाटयाजवळ] राजेवाडी साखर कारखान्याकडे कामावर सप्लेंडर ( गाडी नंबर एम एच 45k 3407)गाडीवरून सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास जात असताना ऊसाने भरुन राजेवाडी येथील सद्गुरू साखर कारखान्याकडे जाणाऱ्या टृकटरला जोराची धडक बसली यामध्ये चांदापुरी येथील अतुल भारत कोपनर हा गंभीर जखमी झाला त्याला ताबडतोब उपचारासाठी अकलूज येथील खाजगी दवाखान्यात नेले माञ त्याला डाॅकटरांनी मयत घोषित केले.तर त्याचा दुसरा सहकारी रुषीकेश केशव कुंभार हा गंभीर जखमी झाला असून त्याचा हात फॅकचर झाला असुन त्याच्यावर अकलूज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान मयत अतुल कोपनर याच्यावर अकलूज येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आले .दोन्हीही जिवलग मिञ वय 25 दररोज राजेवाडी सद्गुरू साखर कारखान्यात एकाच गाडीवरून कामाला जात असताना गंभीर अपघात होऊन अतुल कोपनर मृत्यु पावला तर रुषीकेश कुंभार गंभीर जखमी झाला आहे.मयत अतुल कोपनर याचा अवघ्या दोनच महिन्यापुर्वी विवाह झाला होता.
नवीन संसार फुलणया आधीच त्याच्यावर काळाने घाला घातला .त्याच्या पश्चात पत्नी, आजी ,आजोबा ,आई वडील, भाऊ असा परिवार आहे .अतुल कोपनर याच्या अपघाती निधनाने चांदापुरी परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. पिलीव पोलीस ठाण्यात या घटनेचा उशीरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्ह्ता.

















