वाशी – येथील अजिंक्य क्रीडा मंडळ संचलित अजिंक्य प्राथमिक शाळा वाशी &अजिंक्य विद्यामंदिर व कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता यामध्ये बालचिमुकल्यांनी विविध स्वादिष्ट, खमंग, रुचकर, पदार्थांचे स्टॉल लावले होते.व्यवहाराचे दिले धडे, त्यातूनच नवी पिढी घडे, चिमुकल्यांचा हा आनंद खरा अन त्यासाठीच अजिंक्य विद्यामंदिरात केला आनंद बाजार साजरा!
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्था सचिव श्रीधर पवार यांची उपस्थिती होती, तसेच उदघाटनप्रसंगी शिक्षणप्रेमी नागरिक दादासाहेब चेडे, तुकाराम वीर, विजय कागदे, वर्षाताई कवडे,वंदनाताई कवडे, बाळासाहेब औताडे, प्रीती देशमुख, भाग्यश्री थोरबोले, काकासाहेब मोरे, चव्हाण वैजयंती यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संयोजक शाळेचे मुख्याध्यापक हे होते.
वरील बाल आनंद बाजारात विध्यार्थ्यांनी अनेकविध प्रकारचे स्टॉल लावून वाशीच्या आठवडी बाजाराची आठवण करून दिली. 398स्टॉल च्या माध्यमातून 123680 रुपये उलाढाल झाली.यामध्ये शेतातील विविध रानमेवा,रुचकर पदार्थ, भाजीपाला, किराणा, स्टेशनरी अशा विविध वस्तू लक्ष वेधून घेत होत्या. इयत्ता 1ली ते 10वी च्या पाल्यांनी यामधून प्रत्यक्ष व्यवहाराचे ज्ञान, आकडेमोड, नफा तोटा, आपल्या पालकांचा व्यवसाय यांची प्रत्यक्षात माहिती घेऊन आपले आई-वडील आपल्यासाठी असेच शेतात किंवा व्यवसायात कष्ट करतात याची जाणीव प्रतिक्रियेतून बोलून दाखवली.
मकर संक्रांतीचे औचित्य साधून माता पालकांसाठी हळदी कुंकू, संगीत खुर्ची याचा आनंद महिलांनी घेतला तसेच रोजच्या संसारातून विरंगुळा मिळाला. संगीत खुर्चीतील विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली.
वरील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मीकांत पवार, मनीषा माने तसेच शाळेतील सर्वच स्टाफ यांनी खूप परिश्रम घेतले.
















