भोकरदन : येथील मोरेश्वर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचा (NSS) स्वयंसेवक विद्यार्थी शिवम रामेश्वर सुरडकर यांची एन.एस.एस. मधील उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन 26 जानेवारी 2026 रोजी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून निमंत्रण प्राप्त झाले आहे. या गौरवशाली निवडीबद्दल शिवम यांचा मा. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शिवम सुरडकर याची निवड मोरेश्वर महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना व संपूर्ण परिसरासाठी अभिमानास्पद आहे. या सत्कार प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भगवान डोंगरे, राष्ट्रीय स्तरावर सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. भगवान सोनुने, डॉ. नारायण लव्हाळे यांच्यासह डॉ. ज्ञानेश्वर गायकवाड, शिवम सुरडकर चे काका लक्ष्मण सुरडकर, वडील रामेश्वर सुरडकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
शिवम सुरडकर यास पुढील सामाजिक, शैक्षणिक व राष्ट्रसेवेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या अशा कर्तृत्ववान युवकांमुळेच राष्ट्र उन्नतीकडे वाटचाल करते. शुभमच्या निवडीमुळे परीसरात सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. उपस्थित मान्यवरांनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत,



















