माळशिरस – नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने इतिहास घडवला आहे. हा इतिहास घडवणारे व्यक्ती म्हणजे होणारे पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस होत अठरापगड जाती एकत्र आल्या आणि सर्व समाज एकत्र आला आणि न भूतो न भविष्यती असा निकाल दिला आहे. आता बारा जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. आणि सगळ्यात जास्त रामोशी बेडर समाज या बारा जिल्ह्यांमध्ये जास्त आहे. तन-मन-धनाने आम्ही तुमच्याबरोबर आहोत छत्रपती शिवाजी महाराजांसोबत बहिर्जी नाईक होते त्या पद्धतीने रामोशी समाज आपला बॉडीगार्ड म्हणून राहील ताकतीने आपल्या पाठीमागे उभा आहे असे मत जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांनी माजी आमदार राम सातपुते यांच्या श्रीराम बंगला निवासस्थानी रामोशी बेडर समाज बांधवांच्या उपस्थितीत बोलताना व्यक्त केले.
यावेळी माजी आमदार राम सातपुते यांनी दौलत नाना शितोळे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला.
पुढे बोलताना शितोळे म्हणाले प्रत्येक ठिकाणी आपण काही ना काही मागणी केली. ज्या ज्या ठिकाणी कॅपॅबल मंडळी आहेत, त्या ठिकाणच्या आमदारांपर्यंत आपल्या मागण्या पोहोचवल्या. जिल्हा परिषद व पंचायत समितीला मागण्या केल्या. काही ठिकाणी शब्द दिला तर काही ठिकाणी घोषणा झाल्या. काल बावनकुळे साहेबांचा फोन आल्यानंतर आज मी या ठिकाणी आलो आहे. ज्या मला अपेक्षा होत्या त्या अपेक्षांपेक्षाही जास्त काम रामभाऊंनी केलं आहे. सातपुते यांनी समाजाला भरभरून दिलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील समाज भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे. पण या तालुक्यातील खरा रामोशी बेडर समाज ज्याच्या अंगामध्ये खऱ्या अर्थाने रामोशीच रक्त आहे, हा रामोशी समाज एकही टक्का, एकही मतदान बाजूला जाणार नाही, असा शब्द मी देतो. एवढी कठोर भूमिका मी मांडली आहे, त्या पाठीमागचं कारण म्हणजे, रामोशी बेडर समाज स्वतंत्र काळामध्ये अनेक वर्षांपासून आद्य क्रांतिवीर झाले नव्हते, ते आज झालेत. ते आदरणीय देवाभाऊंनी क्रांतिवीर घोषित केले आणि त्यांची सरकारी जयंती घोषित केली.
आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकावर आज सहा वर्ष झाले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस येतात, मानवंदना देतात. रामोशी समाजाच्या 20 मागण्या त्या ठिकाणी पूर्ण झाल्या. आज राष्ट्रीय स्मारका करता पाच एकर शंभर कोटींची जमीन जमीन असून त्या ठिकाणी 50 कोटी रुपये टाकले आहेत. आणि त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक होऊन अख्या रामोशी बेडर समाजाचा इतिहास होतोय. आमच्या रामोशी समाजामध्ये आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक असतील, बहिर्जी नाईक असतील असे अनेक महापुरुषांनी या भारताकरता पहिल्या तोंडावरती जसे मिलिटरीमध्ये बुरखा बटालियन असतं तसा रामोशी समाज हा लढायांमध्ये पुढे असायचा. इमानदार समाज म्हणून हा मानला जायचा. या समाजाला पूर्णपणे गाडलं होतं. त्या समाजाच्या महापुरुषांचं एकाही सरकारी टपरीला त्या ठिकाणी नाव नव्हतं. पाच आयटी कॉलेजला राजे उमाजी नाईक यांचे नाव लागलं, बहिर्जी नाईक यांचे नाव लागलं, बेडर कनप्पा यांचं लागलं. खूप मोठं काम यांनी केलं आहे.
आमची गोरगरीब जनता जी रोज दुसऱ्याच्या बांधावर जाऊन काम करते, त्यांच्याकरिता राजे उमाजी नाईक यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ उभा केले. त्याकरिता 50 कोटी दिले. आता पाचशे कोटींची तरतूद त्याकरता होत आहे. खऱ्या अर्थाने एवढा मोठा इतिहास आहे. रामोशी समाजाला एका पटलावरती आणण्याकरता एकच व्यक्ती त्या ठिकाणी कारणीभूत आहे ती म्हणजे भारतीय जनता पार्टीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्या देवाभाऊंच्या करता रामोशी समाजाला जे काही करावे लागेल त्या देवाभाऊंच्या कमळाकरता रामोशी बेडर समाज इथून पुढच्या काळात करणार. मी एवढाच शब्द देतो की, तन-मन-धनाने आम्ही तुमच्याबरोबर आहोत. पण बॉडीगार्ड म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसोबत बहिर्जी नाईक होते, त्या पद्धतीने रामोशी समाज आपला बॉडीगार्ड बनवून राहील. आणि ताकतीने आपल्या पाठीमागे उभा राहील.
माळशिरस तालुक्यात अनेक मोठमोठी व्यक्ती आहेत, अनेक गावगुंड तुमच्या वरती टपून आहेत. पण मी आपल्याला या ठिकाणी एकच सांगतो की, आपला इतिहास आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बहिर्जी नाईकांना विचारल्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज किल्ल्याच्या खाली येत नव्हते. आणि आज आपल्याला एवढीच विनंती आहे की रामोशी समाजाला आपण जो न्याय मिळवून दिला आहे आपल्याला विचारल्याशिवाय रामोशी समाज पुढे जाणार नाही. आणि संपूर्ण ताकतीने आपल्या पाठीमागे राहील. हा शब्द मी आपल्याला देतो. परत काही सभा लागतील नाही लागतील मला जमेल नाही जमेल, पण त्यामध्ये उमाजी असतील समाजाची अपेक्षा पूर्ण झालेली आहे. वेळ कमी आहे त्यामुळे आपण ज्यांना ज्यांना सपोर्ट केला आहे, त्यांच्या पाठीमागे आपण जाणार आहे. आमचं भागले आणि आता आम्ही जाणार नाही त्या पद्धतीने आम्ही करणार नाही. आणखीन जोमाने काम करु आणि जास्तीत जास्त मतदान कसे मिळेल या करीता समाजाने प्रयत्न करावा.
याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष अंकुशराव जाधव सर, युवक अध्यक्ष सुधीरजी दादा नाईक, तसेच अग्निनाथ बापू चव्हाण, उमाजी भाऊ बोडरे, काकासाहेब जाधव, अजितजी शिरतोडे, पप्पू बुधावले, पंकज बोडरे, सोमनाथ मदने, बारामतीचे नवनिर्वाचित नगरसेवक किरण खोमणे, सतीश चव्हाण, तुकाराम नाना चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, बापूराव नाना शिरतडे, बाळासाहेब अण्णा मदने, सागर जाधव, दत्ताभाऊ चव्हाण यांसह महायुती घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.























