मोडनिंब – (ता. माढा) येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उद्योजक उदय माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे चेअरमन रणजित बबनराव शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.
भाजपच्या विचारधारेवर विश्वास ठेवून व विकासाच्या राजकारणासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.पक्षप्रवेशाच्या वेळी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उदय माने यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पक्षप्रवेशाचा निर्णय हा विकास, संघटनात्मक बळ आणि जनहिताच्या कामासाठी घेतला आहे. भाजपच्या विचारधारेत काम करताना सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे मत उद्योजक उदय माने यांनी व्यक्त केले.यावेळी शिवाजी कांबळे, योगेश बोबडे, योगेश पाटील,कैलास तोडकरी, शहराध्यक्ष राहुल गांधी, ॲड. गणेश सुर्वे, प्रशांत पाटील,राहुल केदार, आदी उपस्थित होते.























