जेऊर – जेऊरवाडी ता करमाळा येथे केंद्रीय निवड मंडळाकडून घेण्यात पोलिस भरती परिक्षेत यशस्वी झालेल्या योद्धा करिअर अकॅडमी मधील तीन विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान पोलीस उपनिरीक्षक सारिका मारकड यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना पोलीस उपनिरीक्षक सारिका मारकड म्हणाल्या की आत्मविश्वास आणी सकारात्मक विचार असल्यास कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होता येते परंतु यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवली पाहिजे. पोलीस दलामधील नोकरीमध्ये मान सन्मान आणि प्रतिष्ठा आहे.
याबरोबरच समाजसेवेची सुद्धा संधी आहे फक्त ग्रामीण भागातील मुलांनी विशेषता मुलींनी आपल्या मनामध्ये कोणताही न्यूनगंड न बाळगता यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. रेल्वे पोलीस दलात कार्यरत असलेले हवालदार खताळ म्हणाले की पोलीस दलामध्ये भरती होण्यासाठी बोलण्यापेक्षा बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीला जास्त किंमत आहे यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते योद्धा करिअर अकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण भागात मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना घडवण्याचे काम केले जात आहे ही गोष्ट नक्कीच प्रेरणादायी आहे .
केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती झालेल्या साडे येथील शीतल मोरे,इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस भरती झालेले प्रसंन्नजीत कांबळे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती झालेल्या इंदापूर येथील सुशांत माने यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैभव नाईकनवरे यांनी केले तर आभार नवनाथ नाईकनवरे यांनी मानले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष हंबीरराव नाईकनवरे सचिन बळे, विवेक नाईकनवरे, सचिन खंडागळे अशोक सानप,अरूण गायधनी मयुर कटारे प्रज्वल पाटील सुमीत पाटील राहुल कावळे यांच्या सह परिसरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते























