सोलापूर- पारुल विद्यापीठ, बडोदा व एल.एन.सी.टी. विद्यापीठ, भोपाल येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ फुटबॉल व हॉकी स्पर्धेकरिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संघामध्ये सोलापूर सोशल असोसिएशन्स आटर्स ॲण्ड कॉमर्स महाविद्यालयाच्या खेळाडूंची निवड करण्यात आली.
फुटबॉल संघामध्ये रेहान मुल्ला (कर्णधार), अल्तमश वळसंकर, अबू-हुरेरा सालार, समीउल्ला आरेवाले, दानियाल दिवान व अयान काखंडीकर तर हॉकी संघामध्ये शमशोद्दीन पाटील, रहमान बच्चेभाई व इल्हान कुरेशी या सोशलच्या खेळाडूंनी विद्यापीठातर्फे या सर्व खेळाडूंनी सुरेख व उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
यशस्वी खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक डॉ.मुश्ताक शेख व तलहा शेख यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ई. जा. तांबोळी, वरिष्ठ, कनिष्ठ प्राध्यापक वर्ग व तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
फोटो ओळ – यशस्वी खेळाडूसोबत प्राचार्य डॉ. ई. जा. तांबोळी, तलहा शेख व डॉ.मुश्ताक शेख.


























