कुर्डूवाडी – महापालिका निवडणूकीच्या निकालानंतर संपुर्ण राज्यात अस्तीत्वासाठी धडपडणा-या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्टृवादी काँग्रेसला माढा तालुक्यातील कुर्डू आणी भोसरे जि.प.मतदारसंघ सेफ मानला जात आहे. या दोन्ही मतदारसंघात माजी.आ.संजयमामा शिंदे यांचे कायम वर्चस्व राहीले असून कुर्डू मतदारसंघ शिंदेंचा बालेकील्ला समजला जात आहे. सध्याची राजकीय समिकरणे पाहता तालुक्यात मात्र शिंदे विरूध्द मोहीते पाटील असाच सामना रंगणार आहे.
माढा तालुक्यातील सात जि.प.व चौदा पं.स.गणासाठी निवडणूक होणार आहे. तालुक्यातील कुर्डू जि.प.व भोसरे जि.प.हे दोन मतदासंघ चार पं.स.गणासह करमाळा विधानसभा मतदारसंघात येतात. या मतदारसंघात करमाळा विधानसभा मतदारसंघातील छत्तीस गावे सामाविष्ट असून माजी.आ.संजयमामा शिंदे यांचे याठीकाणी वर्चस्व आहे.त्यामुळेच सोलापूर जिल्ह्यात अस्तीत्वासाठी लढणा-या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्टृवादी काँग्रेसला खात्रीशीर यश मिळण्याची शक्यता दाट आहे. बाकीचे मानेगाव,उपळाई,टेंभूर्णी,मोडनिंब व बेंबळे हे जि.प.मतदारसंघ माढा विधानसंभा मतदासंघात येतात.या मतदारसंघात माजी आ.बबनराव शिंदे यांचे वर्चस्व असून भाजपाचे नेते रणजितसिंह शिंदे यांच्याकडे निवडणूकीचे सर्व सुत्रे असून त्यांच्या नेतृत्वात निवडणूका लढवल्या जाणार आहेत.
कुर्डू जि.प.मतदार संघात राष्टृवादी काँग्रेसकडून आण्णासाहेब ढाणे तर कुर्डू पं.स.गणातून संदीप पाटील,पवन पाटील ईच्छूक आहेत. तर आ.नारायण पाटील यांच्याकडून अमोल गायकवाड यांना देखील राष्टृवादी काँग्रेसची उमेद्वारी मीळाल्याचे बोलले जात आहे. कुर्डू गाव हे सात हजार मतदारसंख्येचे गाव आहे.या ठीकाणी आण्णा ढाणे यांना उमेद्वारी मीळाल्यास पक्षाला फायदा मीळण्याची शक्यता आहे.गावात ग्रामपंचायतला त्यांचीच सत्ता आहे. अकोले पं.स.गणातुन अमोल पाटील, गोटू पाटील,धनराज शिंदे हे ईच्छूक आहेत.कुर्डू जि.प.मधून नूकतेच भाजपामध्ये प्रवेश केलेले विक्रम शिंदे ईच्छूक असल्याने या मतदासंघातील समिकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भोसरे जि.प.मतदासंघामध्ये आप्पासाहेब उबाळे,मधुकर बागल,हर्षल बागल,सुरेश बागल तर भोसरे पं.स.गणासाठी आशिष रजपूत, बंडू भोसले,बालाजी बोबडे ईच्छूक आहेत.सामाजिक काम पाहता व तरूणामध्ये क्रेज असलेले आशिष रजपूत यांना उमेद्वारी मीळाल्यास पक्षाला चांगला फायदा होवू शकतो.मात्र याठीकाणी आर.पी.आय.चे बापूसाहेब जगताप यांची कोणाला शिफारस मिळते यावरही बरेच काही अवलंबून आहे.रोपळे पं.स.गणामध्ये श्रीपाद दळवी यांची उमेद्वारी फायनल असल्याचे मानले जाते.
भाजपाचे नेते पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राष्टृवादी काँग्रेसची ठीकठीकाणी गोची केलेली आहे हे नगरपालिका व महानगर पालिकेत पाहीले आहे.त्यांनी जिल्ह्यात सर्वच ठीकाणी राष्टृवादील अडचणीत आणले आहे.जिल्ह्यातच नाही तर संपुर्ण राज्यातच भाजपाने राष्टृवादीची अवस्था खराब केली आहे.त्यामुळे दोन्ही राष्टृवादीने सर्व निवडणूका एकत्र येत लढवण्याचा निर्णय घेतला आहे.दोन्ही राष्टृवादी काँग्रेस एकत्र येण्याने माढा तालुक्यातील राजकीय समिकरणे नक्कीच बदलली आहेत.























