सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर तसेच सोलापूर सोशल असोसिएशन्स् आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम वर्ष कलाचे दोन सत्रात नव्याने पुनर्रचित हिंदी अभ्यासक्रमावर एकदिवसीय विद्यापीठस्तरीय कार्यशाळेचे आयोजन सोमवार, दिनांक १९ जानेवारी २०२६ महाविद्यालयात करण्यात आले होते.
कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभास विद्यापीठाचे प्रो-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी अध्यक्षस्थानी सोलापूर सोशल असोसिएशन्स् आर्ट्स ॲण्ड कॉमर्स कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. इ.जा. तांबोळी होते.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्राचे अध्यक्षपद प्रा. डॉ. गंगाधर बिराजदार यांनी भूषविले. या सत्रात प्रा. डॉ. गिरीश काशीद यांनी विषय विश्लेषण केले. प्रा. डॉ. सुचिता गायकवाड यांनी “आधुनिक हिंदी काव्य एवं व्याकरण” या विषयावर तर प्रा. डॉ. किशोर पवार यांनी “आधुनिक हिंदी कहानी एवं व्याकरण” या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
दुपारनंतर झालेल्या दुसऱ्या सत्राच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. दादासाहेब खांडकर होते. या सत्रात प्रा. डॉ. देवराज मुंडे यांनी विषय विश्लेषण केले. प्रा. डॉ. सतीश घारपडे यांनी “हिंदी साहित्य एवं व्यवहारिक हिंदी तसेच प्रयोजनमूलक हिंदी” या विषयावर तर प्रा. डॉ. विठ्ठल वाघमारे यांनी “रोजगारपरक हिंदी, साक्षात्कार व पटकथा” या विषयावर सखोल विवेचन केले.
समारोप समारंभास प्रा. डॉ. नवनाथ जगताप तसेच प्रा डॉ. सिद्धाराम पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. समारोपाचे अध्यक्षपद प्राचार्य डॉ.अनिल साळूंके यांनी भूषविले.
या कार्यशाळेमुळे प्रथम कलाच्या नव्या हिंदी अभ्यासक्रमाची सखोल माहिती प्राध्यापकांना मिळाली असून अध्यापन प्रक्रियेला निश्चितच दिशा मिळेल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यशाळेला विविध महाविद्यालयांतील हिंदी विषयाचे प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संगिता यादव तर आभार प्रदर्शन समन्वयक प्रा. रईसा मिर्झा यांनी केले.























