अक्कलकोट – तालुक्यातील सहा जिल्हा परिषद साठी ७० जणांनी उमेदवार अर्ज सादर केले होते. त्यापैकी दोन अर्ज छाननीत नामंजूर झाल्याने ६८ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात कायम राहिले आहे. बारा पंचायत समिती साठी ९९ जणांनी उमेदवार अर्ज सादर केले होते. त्यापैकी चार अर्ज छाननीत नामंजूर झाल्याने ९५ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात कायम राहिले असल्यांची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुमित शिंदे यांनी दिली.
उमेदवार अर्ज माघारी घेण्याचे आज पासून सुरु असून २७ जानेवारी पर्यंत राहणार आहे. उमेदवार अर्ज माघारी घेतल्या नंतर निवडणूकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
मंगरूळ जिल्हा परिषद मतदार संघात उमेदवार अर्ज सादर केलेल्या भीमाबाई गायकवाड यांचे सुचकांनी दोन उमेदवारास सुचक म्हणून राहिल्याने यांचा अर्ज नामंजूर केले आहे. जेऊर जिल्हा परिषद मतदार संघात लालचंद नडगम, सलगर पंचायत मतदार संघात मिरजगीचे शव्वाबाई कलप्पा गवळी,सुलेरजवलगी पंचायत समिती मतदार संघात चंद्रकांत वाघमारे, तोळनूर पंचायत समिती मतदार संघात मनोजकुमार पवार आणि चपलगावं पंचायत समिती मतदार संघात कुरनूरचे लक्ष्मी किशोर काळे असे पाच जणांनी उमेदवार अर्ज सादर करताना जात वैदता प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी पोहच सादर केल्या नसल्याने त्यांचा उमेदवार अर्ज नामंजूर झाला आहे. सलगर जिल्हा परिषद मतदार संघात सजनबाई बिराजदार यांनी उद्धव सेना पक्षाकडून उमेदवार भरले असून पूर्णपणे न भरलेली ब फार्म शिवसेना पक्षाकडून दिले आहे. यामुळे पक्षाचे उमेदवार रद्द झाले असल्याने अपक्ष उमेदवार म्हणून कायम राहिले असल्यांची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुमित शिंदे यांनी दिली आहे.
























