वळसंग – पोलीस ठाणे येथे माननीय पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांची वार्षिक तपासणी यशस्वीरीत्या पार पडली. यावेळी पोलीस अधीक्षक सरांनी पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीचा सखोल आढावा घेतला.तपासणीदरम्यान सरांनी गुन्हे, अर्ज, मयत प्रकरणे तसेच इतर अभिलेखांची बारकाईने पाहणी केली. तसेच संपूर्ण पोलीस स्टेशनच्या परिसराची तपासणी करून परिसर अत्यंत स्वच्छ, सुसज्ज व नागरिकाभिमुख स्वरूपात विकसित करण्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
यानंतर माननीय पोलीस अधीक्षक सरांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा दरबार घेत त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या तसेच कामकाज अधिक प्रभावी करण्याबाबत मार्गदर्शन केले.
याच प्रसंगी माननीय पोलीस अधीक्षक सरांच्या हस्ते चोरी व फसवणूक प्रकरणातील पुण्यातून हस्तगत केलेला मुद्देमाल संबंधित फिर्यादींना परत करण्यात आला. मुद्देमाल मिळाल्यानंतर फिर्यादींनी आनंद व्यक्त करत सरांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व शब्दरूपी ऋण व्यक्त केले.
तसेच पोलीस ठाण्यातील मुद्देमालाची संपूर्ण माहिती डिजिटल पद्धतीने जतन करण्यात आली असून प्रत्येक मुद्देमालावर क्यूआर कोड आधारित प्रणाली राबविण्यात आली आहे. यामुळे मुद्देमालाची माहिती तत्काळ उपलब्ध होण्यास मदत होत आहे.
























