सोलापूर – महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बाळे सोलापूर संचलित जिजामाता प्राथमिक शाळा व जिजामाता बालक मंदिर तुळशीदासनगर कोंडी यांच्या संयुक्त विद्यमाने मकर संक्रांत निमित्त हळदी कुंकू कार्यक्रम,वाण वाटप, विविध स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालक मंदिरच्या प्रमुख सुरेखा नान्नजकर होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्या सौ सुप्रियाताई भोसले, मुख्याध्यापक चंद्रकांत कुंटेलूसर,माता पालक संघाच्या पवारताई, प्रशालेच्या वनगेमॅडम उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते महिलांना वाण वाटप करण्यात आले व सुप्रियाताई भोसले व मुख्याध्यापक चंद्रकांत कुंटेलूसर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.
यावेळी महिलांचा ‘उखाणे घेणे’ हा विशेष कार्यक्रम झाला.या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सचिनभैय्या ठोकळ सचिवा शिल्पाताई ठोकळ संचालक व प्राचार्य दत्तात्रय गाजरेसर यांनी विशेष कौतुक केले. कार्यक्रमानंतर सर्वांना स्नेह भोजन देण्यात आले याकरिता शहाजी भोसले यांच्या कडून मोलाचे सहकार्य लाभले.
प्रारंभी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व संस्थापिका माजी आमदार कै निर्मलाताई ठोकळ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक चंद्रकांत कुंटेलूसर यांनी केले.या कार्यक्रमास महिला पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माता पालक संघ, पालक शिक्षक संघ, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
























