Sunday, March 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शहीद मेजर अमोल निलंगे स्मृतीदिन सोहळा चैतन्यपूर्ण वातावरणात साजरा

तरुण भारतbyतरुण भारत
January 28, 2026
in marathwada
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जेऊर – साडे (ता. करमाळा) येथे स्मारक समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला शहीद मेजर अमोल निलंगे स्मृतीदिन सोहळा अत्यंत उत्साहात व भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

या सोहळ्यास भारतीय सेनेचे अधिकारी कर्नल मा. श्री. केदार भिडे व कर्नल मा. श्री. कुलदीप करपे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. 

त्यांच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान द. सो. पं. समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी भूषवले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून मान्यवरांचा परिचय प्रा. गणेश करे-पाटील यांनी करुन दिला .

कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी शहीद मेजर अमोल निलंगे यांच्या स्मृतिस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून एन.सी.सी. कॅडेट्ससह श्रद्धांजली वाहिली.

कर्नल कुलदीप करपे यांनी आपल्या स्फूर्तिदायी भाषणात तरुणांना देशसेवेसाठी सज्ज होण्याचे आवाहन करताना आगामी काळात देशाच्या सुरक्षेपुढे उभ्या राहणाऱ्या आधुनिक आव्हानांचा उल्लेख केला. तंत्रज्ञानाधारित युद्धपद्धती, सायबर सुरक्षा, दहशतवाद व सीमासुरक्षेतील बदलती परिस्थिती यांचा सामना करण्यासाठी सक्षम, शिस्तबद्ध व देशभक्त तरुणांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणासोबतच शारीरिक तंदुरुस्ती, नैतिक मूल्ये व राष्ट्रनिष्ठा जोपासण्याचे आवाहन करत त्यांनी तरुणांनी सैन्य व सुरक्षादलांमध्ये करिअर करण्याचा विचार करावा, असे मत व्यक्त केले.

याप्रसंगी कर्नल केदार भिडे , गटविकास अधिकारी मनोज राऊत, तहसिलदार  शिल्पा ठोकडे, पोलीस निरीक्षक रणजीत माने, डॉ. अॅड बाबुराव हिरडे,, श्री. अवचर साहेब, प्रा.बाळकृष्ण लावंड यांनी मनोगत व्यक्त केले.

डॉ. प्रचिती पुंडे यांनी शहीद मेजर अमोल निलंगे स्मारक समितीस पोडियम भेट स्वरूपात प्रदान केले. या पोडियमचा उपयोग भविष्यात विविध कार्यक्रमांमधून सक्षम व प्रभावी वक्ते घडविण्यासाठी होईल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांच्या या उपक्रमशील योगदानाबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचा सन्मान करून मनापासून धन्यवाद व्यक्त केले.

या समारंभ प्रसंगी सामाजिक दायित्वासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शहीद स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

यामध्ये पोलीस निरीक्षक रणजित माने, तहसीलदार शिल्पा ठोकडे, ग्रामीण भागातील नागरिक सेवेसाठी गुलाबराव देवकते, प्रसिद्ध पक्षी अभ्यासक प्रा. कल्याणराव साळुंके, प्रगतशील बागायतदार संभाजी भोसले, आदर्श सैनिक किरणजी ढेरे  व आदर्श कला शिक्षक सचिन शिंदे यांचा समावेश होता.

तर उपक्रमशील शाळा पुरस्कार पीएमश्री साधनाबाई नामदेवराव जगताप प्राथमिक मुलींची शाळा क्र. १ यांना प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन साडे ग्रामस्थ, आजी-माजी सैनिक कल्याणकारी मंडळ करमाळा आणि यशकल्याणी सेवाभावी संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

या स्मृतीदिन कार्यक्रमास कर्नल केदार भिडे, कर्नल कुलदीप करपे, प्रोलक्स वेलनेस प्रोडक्शन प्रा. लि.च्या संस्थापिका डॉ. प्रचिती पुंडे, तहसीलदार शिल्पा ठोकडे, पोलीस निरीक्षक रणजित माने, यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील, ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष डॉ. अॅड. बाबुराव हिरडे, सैनिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष अक्रूर शिंदे, जिल्हा इंग्रजी लँग्वेज असो.चे अध्यक्ष बाळकृष्ण लावंड, जीवन शिक्षणचे अध्यक्ष जयेश पवार, योध्दा अॅकॅडमीचे नवनाथ नाईकनवरे, वीर पिता अरविंद निलंगे व वीर माता अनुजा निलंगे आदी मान्यवर उपस्थित होते.

 पुणे, सातारा, धाराशिव येथून विशेष निमंत्रित तसेच करमाळा तालुक्यातील आजी-माजी सैनिक, वीर पत्नी, वीर माता-पिता व देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन गाडेकर यांनी केले, तर अक्रूर शिंदे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Post Views: 19
Previous Post

दररोज पाणी देण्यासाठी जल वितरण व्यवस्था विस्तारीकरणाचे प्रयत्न  : डॉ. ओम्बासे 

Next Post

आश्लेषा बागडे ठरली २०२६ ची महिला मंगळवेढा केसरी 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

आश्लेषा बागडे ठरली २०२६ ची महिला मंगळवेढा केसरी 

ताज्या बातम्या

उन्हाळा बाधू नये म्हणून घ्या पृथ्वीवरचे अमृत … डॉ. मुकुंद लिमये

March 14, 2026

पिलीव येथील भाजपच्यावतीने इफ्तार पार्टीचे आयोजन.

March 14, 2026

संजय राऊतानी जय श्रीराम नाऱ्याची केली चेष्टा…

March 14, 2026

खा. प्रणिती शिंदे यांच्या प्रशासनाला गॅसबाबत सूचना…..

March 14, 2026

सुळेवाडी येथे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय योजनांच्या शिबीराचे आयोजन.

March 14, 2026

पंडित भीमराव कनकधर आणि पंडित विठ्ठलराव क्षीरसागर पुण्यतिथीनिमित्त सोलापुरात गुरु स्मरण सोहळा

March 14, 2026

नक्षत्र कराओके सिंगिंग अकॅडमीच्या वतीने कर्तुत्ववान महिलांचा सन्मान

March 14, 2026

दौड एसआरपीएफ दलातील विलास सर्जेराव शिंदे (वय ३५) या जंवानाने भुळेगाव येथे गळफास घेऊन आत्महत्या

March 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0733873

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697