Wednesday, July 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दररोज पाणी देण्यासाठी जल वितरण व्यवस्था विस्तारीकरणाचे प्रयत्न  : डॉ. ओम्बासे 

तरुण भारतbyतरुण भारत
January 28, 2026
in solapur
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : २०६० पर्यंतच्या भविष्यातील गरजांचा विचार करून शहरातील सर्व नागरिकांना दररोज पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जल वितरण व्यवस्थेचे विस्तारीकरण आणि बळकटीकरण करण्यासाठी ठोस प्रयत्न सुरू आहेत.

प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांनी एकत्रित प्रयत्न केल्यास सोलापूर हे स्वच्छ, सुरक्षित, सक्षम आणि आदर्श शहर बनेल, असा विश्वास महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी व्यक्त केला.

           भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने इंद्रभुवन परिसरात आज सकाळी उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने झाली. राष्ट्रगीत व राज्यगीतानंतर तंबाखूमुक्ती, कुष्ठरोग जनजागृती आणि बालविवाह प्रतिबंधक शपथ उपस्थितांनी घेतली. मुख्य अग्निशामक अधिकारी राकेश साळुंखे यांनी या कार्यक्रमाचे संचलन केले.

              यावेळी अतिरिक्त आयुक्त विणा पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, मुख्य लेखाधिकारी डॉ.रत्नराज जवळगेकर, मुख्य लेखापरीक्षक सदानंद वाघमोडे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, गिरीश पंडित, मनीषा मगर, नगरसेवक अमोल शिंदे, आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने, नगर अभियंता सारिका अकुलवार, सार्वजनिक आरोग्य अभियंता वेंकटेश चौबे, मुख्य अग्निशामक अधिकारी राकेश साळुंखे , अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी, नियंत्रण अधिकारी तपन डंके, सामान्य प्रशासन विभागाचे रजाक पेंढारी, युवराज गाडेकर, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार,कार्यकारी अभियंता (विद्युत) राजेश परदेशी, महादेव इंगळे,  यांच्यासह विविध विभाग अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स रिफॉर्म्स कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरीबद्दल संगणक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

         यानंतर आयुक्तांनी संविधानातील मूल्यांचे पालन, लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांचे योगदान महत्वाचे असल्याचे सांगत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महानगरपालिका राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. नगर अभियंता विभागामार्फत रस्ता सुधारणा कामे पूर्ण झाली असून, ९८ कोटींचा स्टॉर्म वॉटर ड्रेनेज प्रकल्प सुरू आहे.महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत ४२९ कोटींची भूमिगत भुयारी गटार योजना कामे प्रगतीपथावर आहेत.भुयारी गटार योजनेअंतर्गत ४९ एमएलडी क्षमतेचे सांडपाणी शुद्धीकरण केंद्र उभारले जात आहे. महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी हे या यंत्रणेचे खरे कणा आहेत.त्यांच्या कल्याणासाठी पदोन्नती, वेतनवाढ, अनुकंपा नियुक्त्या आणि प्रलंबित देयकांबाबत नियोजनबद्ध कार्यवाही सुरू आहे. यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांना ४ टक्के महागाई भत्ता डिसेंबर २०२५ पासून लागू करण्यात आला आहे. याशिवाय वारसा हक्क आणि अनुकंपा याच्या माध्यमातून मागील वर्षभरात १५० हून अधिक कर्मचाऱ्यांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. घन कचरा व्यवस्थापन विभागात ५५ कर्मचाऱ्यांना मुकादम पदावर पदोन्नती आणि ३३० कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यात आला आहे.

       सूत्रसंचालन नगर सचिव प्रवीण दंतकाळे यांनी केले. कार्यक्रमास कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी अजितकुमार खानसोळे, जनसंपर्क अधिकारी श्री. गणेश बिराजदार यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 आयुक्तांचे ठळक मुद्दे

— २०६० पर्यंत दररोज पाणीपुरवठ्यासाठी ८९२ कोटींची जागतिक बँक सहाय्यित जलपुरवठा योजना

— उजनी–सोलापूर समांतर जलवाहिनी प्रकल्पामुळे प्रायोगिक पाणीपुरवठा सुरू

—  ९८ कोटींचा स्टॉर्म वॉटर ड्रेनेज प्रकल्प प्रगतीपथावर

—  ४२९ कोटींची भुयारी गटार योजना व ४९ एमएलडी क्षमतेचे सांडपाणी शुद्धीकरण केंद्र

— सर्व महापालिका सेवा ऑनलाईन; नागरिकांचा वेळ व खर्च वाचणार

— यापूर्वी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नती, वेतनवाढ, ४ टक्के महागाई भत्ता लागू 

Post Views: 46
Previous Post

बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

Next Post

शहीद मेजर अमोल निलंगे स्मृतीदिन सोहळा चैतन्यपूर्ण वातावरणात साजरा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

शहीद मेजर अमोल निलंगे स्मृतीदिन सोहळा चैतन्यपूर्ण वातावरणात साजरा

ताज्या बातम्या

मनपा मुलांची केंद्र शाळा 9 मध्ये शालेय साहित्याचे वाटप

मनपा मुलांची केंद्र शाळा 9 मध्ये शालेय साहित्याचे वाटप

July 1, 2026
सोलापूर महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

सोलापूर महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

July 1, 2026
सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

July 1, 2026

वालचंद’चे वरिष्ठ लिपिक भगवान खुरगांवकर यांचा सन्मान 

July 1, 2026
“वालचंद कनिष्ठ महाविद्यालय अकरावी  प्रवेशोत्सव जल्लोषात संपन्न “

“वालचंद कनिष्ठ महाविद्यालय अकरावी  प्रवेशोत्सव जल्लोषात संपन्न “

July 1, 2026
डॉ. देशपांडे संघाचा हबीब संघावर  दिमाखदार विजय

डॉ. देशपांडे संघाचा हबीब संघावर  दिमाखदार विजय

July 1, 2026
पद्मशाली शिक्षण संस्था येथे विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

पद्मशाली शिक्षण संस्था येथे विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

July 1, 2026

महापालिका भंगार चोरी प्रकरणात मोठी कारवाई

July 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0952109

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697