माळशिरस – जिल्हापरिषद ,पंचायत समितीच्या निवडणूकीचा प्रचार ३ फेब्रुवारी पर्यंत असल्याने प्रचाराच्या वाहनांचा परवाना काढण्यासाठी आज पंचायत समितीच्या एक खिडकी मध्ये गर्दी झाली असून परवान्यासाठी लागणाऱ्या कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी उमेदवारांची व प्रतिनिधींची दमछाक झाल्याचे चित्र आज दिसून आले.
सर्वच पक्षांच्या प्रचाराचा शुभारंभ आज झाला असून आपल्या भागात प्रचार करण्यासाठी लागणाऱ्या वाहनांचा परवाना ,तसेच उमेदवार व प्रतिनिधीच्या वाहनांचा परवाना असणे आवशक असल्याने परवाना काढण्यासाठी आज एक खडकी मध्ये गर्दी झाली होती,परवान्यासाठी गाडीचे आर .सी.टी.सी ,विमा,पी.यु.सी .चालक परवाना ,गाडी मालकाची समती आदी कागदपत्र लागत असल्याने या कागदपत्राची जुळवाजुळव करण्यासाठी प्रतिनिधी धावपळ करीत असल्याचे दिसून आले.त्याच बरोबर प्रत्येक वाहनाला परवाना काढण्यासाठी दोन हजार शुल्क भरणे आवशक होते.तसेच या प्रचाराच्या वाहनावर लावलेल्या प्रचाराच्या फलकांची तपासणी केली जात होती. यासाठी अकलूज परिवहन विभागाच्या सुषमा गुणवरे तपासणी करीत होत्या .प्रचाराची मुदत ३ फेब्रुवारी पर्यंत असल्याने आज सर्वच पक्षाची परवान्यासाठी धावपळ दिसून आली.


















