Thursday, July 2, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पावसाळी पाणी साचण्यावर कायमस्वरूपी तोडगा; ७४ नाल्यांच्या पर्जन्यजल नियंत्रण आराखड्यास मंजुरी

तरुण भारतbyतरुण भारत
January 30, 2026
in marathwada
0
0
SHARES
26
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : शहरात दरवर्षी पावसाळ्यात सखल भागांमध्ये पाणी साचून नागरिकांना होणाऱ्या त्रासावर आता कायमस्वरूपी उपाययोजना होणार आहेत. सोलापूर महानगरपालिकेने शहरातील पावसाळी पाणी साचण्याच्या समस्येवर ठोस तोडगा काढण्यासाठी ७४ नाल्यांचा पर्जन्यजल नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला असून, या आराखड्यास महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सक्षम मंजुरी दिली आहे.

             सन २०१८, २०२० आणि २०२५ मध्ये शहरातील अनेक भागांमध्ये गंभीर जलसंचय निर्माण झाला होता. पावसाचा योग्य निचरा न होणे, नैसर्गिक प्रवाहात अडथळे व नाल्यांवरील अतिक्रमण ही यामागील प्रमुख कारणे होती. ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी महानगरपालिकेने सखोल अभ्यास करून हा व्यापक आराखडा तयार केला आहे. ड्रोन सर्व्हेक्षण, सॅटेलाईट इमेज, टोपोशीट व टोटल स्टेशन सर्व्हेच्या आधारे शहरातील १७८ चौ.कि.मी. क्षेत्रात ७४ नाले निश्चित करण्यात आले असून, त्यांची ६ बेसिनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. नाल्यांची एकूण लांबी सुमारे ११५.७७ कि.मी. इतकी आहे.

           आराखड्यानुसार नाल्यांची सफाई, गाळ काढणे, अतिक्रमणे हटवणे, नाल्यांची रुंदी व खोली वाढवणे, भूमिगत नाले, बॉक्स कल्व्हर्ट व क्रॉस ड्रेनेजची कामे करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात ३० नाल्यांवर प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आले आहे.

महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर हा संपूर्ण आराखडा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला असून, सोलापूर शहराच्या पावसाळी समस्येवर हे शाश्वत आणि ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे.

असा आहे आराखडा

एकूण नाले : ७४

बेसिन : ६

नाल्यांची लांबी : ११५.७७ कि.मी.

पहिला टप्पा : ३० नाले

मंजुरी : आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत

आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार मंजुरी

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम २६ व कलम ३० अंर्तगत प्राप्त अधिकारास अनुसरून तसेच केंद्रशासनाचे विधी व न्याय मंत्रालय यांचेकडील आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील दि. २९ मार्च २०२५ च्या (Amendment) दुरुस्तीमधील कलम ४१A नुसार शहर प्राधिकरण (Urban Authority) स्थापित करून मा. आयुक्त, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर यांना शहर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून अधिकार प्राप्त झाले असून, दि. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या आढावा बैठकीत ७४ नाल्यांचा पर्जन्यजल नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन आराखडा, तांत्रिक अहवाल तसेच तात्पुरत्या व कायमस्वरूपी उपाययोजनांना सक्षम मंजुरी देण्यात आली आहे.

माहिती वेबसाईटवर उपलब्ध

सोलापूर शहर आपत्ती व्यवस्थापन आराखडा, पर्जन्यजल नियंत्रण आराखडा, नालानिहाय सर्व्हेक्षण अहवाल व समिती बैठकींचे इतिवृत्तांत सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.https://www.solapurcorporation.gov.in/smc/dmp_plan_details सोलापूर शहरातील पावसाळी पाणी साचण्याच्या समस्येवर शाश्वत व कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे महानगरपालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

 बेसिननिहाय वर्गीकरण याप्रमाणे :

अ. क्र. बेसिन समाविष्ट नाले एकूण लांबी (कि.मी.)

1 बेसिन क्र. १ सुनील नगर ते दहीटणे 10    13.02

2 बेसिन क्र. २ रेल्वे नाला   32    52.27

3  बेसिन क्र. ३ आदिला नदी  05   16.89

4  बेसिन क्र. ४ विजापूर रोड ते सोरेगाव तलाव 04   9.22

5  बेसिन क्र. ५ होटगी रोड ते मजरेवाडी 09   12.54

6  बेसिन क्र. ६ आकाशवाणी केंद्र, नवले नगर ते देसाई सांडपाणी प्रक्रिया केंद्र  14     11.83

एकूण    74    115.77कि.मी.

Post Views: 67
Previous Post

CTET परीक्षा व जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक एकाच दिवशी; शिक्षकांपुढे मोठा पेच

Next Post

प्रचार वाहन परवान्यासाठी कागदपत्रासाठी पूर्तता करताना उमेदवार प्रतिनिधींची दमछाक

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

प्रचार वाहन परवान्यासाठी कागदपत्रासाठी पूर्तता करताना उमेदवार प्रतिनिधींची दमछाक

ताज्या बातम्या

मनपा मुलांची केंद्र शाळा 9 मध्ये शालेय साहित्याचे वाटप

मनपा मुलांची केंद्र शाळा 9 मध्ये शालेय साहित्याचे वाटप

July 1, 2026
सोलापूर महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

सोलापूर महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

July 1, 2026
सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

July 1, 2026

वालचंद’चे वरिष्ठ लिपिक भगवान खुरगांवकर यांचा सन्मान 

July 1, 2026
“वालचंद कनिष्ठ महाविद्यालय अकरावी  प्रवेशोत्सव जल्लोषात संपन्न “

“वालचंद कनिष्ठ महाविद्यालय अकरावी  प्रवेशोत्सव जल्लोषात संपन्न “

July 1, 2026
डॉ. देशपांडे संघाचा हबीब संघावर  दिमाखदार विजय

डॉ. देशपांडे संघाचा हबीब संघावर  दिमाखदार विजय

July 1, 2026
पद्मशाली शिक्षण संस्था येथे विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

पद्मशाली शिक्षण संस्था येथे विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

July 1, 2026

महापालिका भंगार चोरी प्रकरणात मोठी कारवाई

July 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0952296

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697