बाऱ्हाळी – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित दादा पवार यांचे विमान दुर्घटनेत दुःखद निधन झाल्याचे समजताच महाराष्ट्रातील संपूर्ण शहरासह गावे, वाडी तांड्यावर दुःखाची लाट पसरली. मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी बाजारपेठ शंभर टक्के बंद ठेवून गावकऱ्यांच्या वतीने येथील राष्ट्रीय महामार्गावर शोकसभा घेऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी त्यांच्या राजकारणातील कुशल कामगिरीबद्दल अनेकांनी आपले विचार व्यक्त करून राजकारणातील एक जनप्रिय, कणखर नेतृत्व हरवल्याची खंत व्यक्त केली. अमर रहे…. अमर रहे ….अजितदादा अमर रहे ….अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजन देशपांडे, माजी समाज कल्याण सभापती स्वप्नील चव्हाण , भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर देशमुख, प्रतिष्ठित व्यापारी अरुण महाजन, चेअरमन व्यंकट पाटील उमाटे, तंटामुक्ती अध्यक्ष हणमंत वाडीकर, बालाजी सोमावार , अभिजीत महाजन, राजेश तोटकर, डॉ. रमेश राठोड, सुरेश सुकुनगे, साईनाथ कोटगीरे, नरसिंग अस्वले, गणेश जाधव, केशव रापतवार, संपत गायकवाड, सुभाष गवते, प्रकाश देवरे, शेख जाकीर हुसेन, आनंदा बनकर, तुकाराम वाघमारे, अंतेश्वर कोलेवाड, प्रकाश भंगे, नामदेव अवधूते, मनोज अस्वले, गोविंद रोकडे यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते.

























