सांगोला – शनिवार दि.३१ जानेवारी रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह तसेच विद्यामंदिर प्रशाला व ज्यु.कॉलेज, सांगोला येथे स.१० ते ५ वा. पर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने दुसरे प्रशिक्षण संपन्न झाले.
यावेळी मतदान प्रक्रिया निर्भय, पारदर्शक व कायद्याच्या चौकटीत पार पडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी बी.आर.माळी व सहा.निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत यांनी सूचना दिल्या. तसेच निवासी नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे, समाधान वाघमोडे यांनी ईव्हीएम बाबत मार्गदर्शन करत सिलिंग प्रोसेस दाखवत मॉक पोल, मतदार ओळख प्रक्रिया याबाबत माहिती दिली. प्रशिक्षणासाठी केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी एक, दोन, तीन, व बुथवरील परिचर असे एकूण १४७० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
यावेळी कैलास मडके, शशिकांत सुतकर, नितीन गवळी, नागेश हवेली, सर्व ग्राम महसूल अधिकारी, मंडल अधिकारी हरिश्चंद्र जाधव, झोनल अधिकारी उपस्थित असल्याची माहिती मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत यांनी दिली.


























