ममुखेड – जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय,मुखेड येथील पुरोगामी अभिवक्ता संघाची २०२६-२०२७ साठीची नुतन कार्यकारणी गठीत करण्यात आली असून यावेळी पुरोगामी अभिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.ए.जे.शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी ॲड.ए.पी.लष्करे सचिवपदी ॲड.टी.एम. वाघमारे सहसचिव पदी ॲड.पी.सी.कांबळे, कोषाध्यक्ष पदी ॲड.वाय.जे.तांबोळी, महिला प्रतिनिधी पदी ॲड.ए.एच.वडजे तर प्रसिद्धीप्रमुख पदी ॲड.मिलिंद कांबळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
पुरोगामी अभिवक्ता संघाचे माजी अध्यक्ष ॲड.यु.बी.सोनटक्के यांच्या कार्यकारणीचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे नुतन कार्यकारणीचे गठण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत निवडणूक अधिकारी ॲड.आर.जी.इमडे व सहाय्यक निवडणूक अधिकारी ॲड.एम.सी.गवलवाड यांच्या सुचनेनुसार सदर निवडणूक कार्यक्रम पार पडला असून अभिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी ॲड.ए.जे.शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी ॲड.ए.पी.लष्करे सचिवपदी ॲड.टी.एम. वाघमारे सहसचिव पदी ॲड.पी.सी.कांबळे, कोषाध्यक्ष पदी ॲड.वाय.जे.तांबोळी, महिला प्रतिनिधी पदी ॲड.ए.एच.वडजे तर प्रसिद्धीप्रमुख पदी ॲड.मिलिंद कांबळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली
यावेळी पुरोगामी अभिवक्ता संघातील सदस्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे व सदस्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
























