मोहोळ – यावली ता.मोहोळ तालुक्यातील कु. अपर्णा मल्लिनाथ गुरव यांनी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामधून पीएच.डी. हि संशोधनामधील पदवी प्राप्त केली आहे. “औसेकर घराण्याचा सांप्रदायिक इतिहास – एक चिकित्सक अभ्यास (१७७० – २००० ) हा विषय घेऊन त्यांनी हि पदवी प्राप्त केली आहे.
मिळवलेल्या या यशाबद्दल श्री नाथ संस्थान, औसाचे पाचवे पिठाधीपती सदगुरू गुरुबाबा महाराज औसेकर, श्रीनाथ सेवा संस्थान औसाचे अध्यक्ष व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती श्री क्षेत्र पंढरपूरचे सह-अध्यक्ष सदगुरु गहिनीनाथ महाराज औसेकर, श्री. गोरखनाथ महाराज औसेकर, श्री. श्रीरंग गहिनीनाथ महाराज औसेकर, श्री. ज्ञानराज गुरुबाबा महाराज औसेकर यांनी प्रसाद रुपी शाल, श्रीफळ देऊन अभिनंदन व सत्कार केला.

























