Sunday, February 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

खो-खो आणि कबड्डीचा ‘भाग्यविधाता’ हरपला!

तरुण भारतbyतरुण भारत
February 7, 2026
in sports
0
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात अनेक नेते येतात आणि जातात, पण खेळाडूंच्या गळ्यातील ताईत होण्याचं भाग्य फार कमी जणांना लाभतं. सत्तेच्या वर्तुळात वावरणारा एक कडक शिस्तीचा प्रशासक जेव्हा मैदानात उतरतो, तेव्हा तो केवळ एक राजकारणी नसून हजारो खेळाडूंचा ‘पालक’ असतो, हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केलं.

विमान अपघातात  अजितदादांचे निधन झाले. आज दादा आपल्यात नाहीत, ही कल्पनाच क्रीडा विश्वाला सुन्न करणारी आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या क्रीडा क्रांतीचा एक सुवर्ण अध्याय काळाच्या पडद्याआड गेला. खेळाडू आणि विविध क्रीडा संघटना यांच्या मागे ताकदीने उभा राहणारा खो-खो प्रेमींचा ‘पालक’ हरवला.

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदाची धुरा  २००६ मध्ये  अजितदादांनी सांभाळली. तब्बल १२ वर्षे त्यांनी खो-खोला केवळ एका खेळाचे स्वरूप न देता, त्याला एक सन्मान मिळवून दिला. नियमानुसार जेव्हा ‘कुलिंग पिरियड’ आला, तेव्हा खो-खो संघटनेच्या अध्यक्षपदावरून ते बाजूला झाले. अनेक संघटनांनी त्यांना अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारा अशी विनंती केली. मात्र, दादांचं प्रेम मातीतील खेळांवर होतं. त्यांनी महाराष्ट्र कबड्डी असेसिएशनची जबाबदारी स्वीकारली. खो-खो आणि कबड्डी यासारख्या खेळांना ग्लॅमर आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यात दादांचा सिंहाचा वाटा राहिला, म्हणूनच त्यांना या खेळांचे ‘भाग्यविधाता’ मानले जाते. २०१२ च्या काळात खो-खो खेळाचा पोलीस गेम्स मध्ये समावेश नव्हता. खेळाडूंची ही समस्या  

महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी दादांच्या पुढे मांडली आणि त्यांनी विलंब न लावता पाठपुरावा करून खो-खोचा समावेश पोलीस गेम्समध्ये करवून घेतला. त्यामुळं शेकडो खो-खो खेळाडू पोलीस गणवेशात अभिमानाने वावरत आहेत, त्यांच पुण्य दादांना जातं.

२०१३ मध्ये ऊर्जामंत्री असताना त्यांनी महावितरणमधील भरतीचे दरवाजे खेळाडूंसाठी उघडले. त्या एका निर्णयामुळे ६० खेळाडूंच्या आयुष्याचं सोनं झालं, ज्यात जवळपास ५२ खेळाडू केवळ खो-खोचे होते. ही त्यांची खेळाप्रती असलेली तळमळ होती. नुकत्याच झालेल्या थेट भरती प्रक्रियेतही त्यांनी विशेष लक्ष घातल्याने विविध खेळातील प्रावीण्य प्राप्त जवळपास पावणेदोनशे खेळाडूंना क्रीडा खात्यात नियुक्ती देण्यात आली, ज्यात खो-खोच्या ३८ खेळाडूंचा समावेश आहे.

निधीची कमतरता कधीच पडू दिली नाही

भाई नेरुरकर राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचे श्रेय पूर्णतः दादांना जाते. २०१२ मध्ये या स्पर्धेसाठी १९ लाखांची तरतूद केली. त्यानंतर २०२५ मध्ये या स्पर्धेची तरतूद १ कोटी रुपयांपर्यंत नेण्याचं धाडस फक्त दादाच करू शकले. खो-खो असो, कबड्डी असो वा कुस्ती, खेळाडूंना मिळणाऱ्या बक्षिसांच्या रकमेत त्यांनी कधीही आखडता हात घेतला नाही. खेलो इंडिया आणि नॅशनल गेम्समधील विजेत्यांना ७ लाख, ५ लाख अशा मोठ्या रकमेची राज्य शासनाच्या वतीने प्रोत्साहनपर मदत देऊन त्यांनी खेळाडूंची जिद्द जिवंत ठेवली. त ठेवली,

अपूर्ण राहिलेलं ‘ऑलिम्पिक भवन’चं स्वप्न

महाराष्ट्रात एक जागतिक दर्जाचं ‘ऑलिम्पिक भवन’ असावं, हे दादांचं स्वप्न होतं. सत्तेत आल्यावर त्यांनी क्रीडा खाते आपल्या पक्षाचे आमदार संजय बनसोडे यांच्यावर क्रीडामंत्री पदाची जबाबदारी सोपवली होती. त्यांच्या माध्यमातून बालेवाडीत जागा उपलब्ध करून दिली आणि ७५ कोटींचा निधी मंजूर केला. आज या वास्तूचं काम अर्ध्याहून अधिक पूर्ण झालं आहे. पण नियतीचा खेळ बघा, ज्या माणसाने हे स्वप्न पाहिलं, ज्यांनी विटामातीचं हे मंदिर उभं करण्यासाठी कष्ट घेतले, ते दादा मात्र उद्घाटनाला नसतील. ही खंत आज प्रत्येक क्रीडा कार्यकर्त्याच्या मनात सलत आहे.

जागतिक स्तरावर महाराष्ट्राचा ठसा

२०२५ मध्ये दिल्लीत झालेली ‘वर्ल्ड कप खो-खो स्पर्धा असो वा महाराष्ट्रात सुरू झालेल्या राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, दादांनी नेहमीच खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळवून दिले. दिल्लीतील स्पर्धेसाठी त्यांनी परराज्यात असूनही स्पर्धा आयोजित करण्यासाठी १० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला, हे केवळ खेळावरील प्रेमापोटीच शक्य होतं.

शेवटची एक्झिट आणि एक कायमची पोकळी

बालेवाडीत ‘कॉमनवेल्थ खो-खो चॅम्पियनशिप’ घेण्याचे त्यांचे नियोजन सुरू होते. त्यासंदर्भात चार बैठकाही झाल्या होत्या. पण ही स्पर्धा प्रत्यक्षात येण्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. एका दुर्दैवी विमान अपघाताने महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राचा सूर्य मावळला.

दादा गेले, पण त्यांनी मागे ठेवलेला वारसा, त्यांनी दिलेला नोकऱ्यांचा आधार आणि खेळाडूंप्रती असलेली त्यांची संवेदना नेहमीच जिवंत राहील. आज महाराष्ट्र खो-खो असोसिएशन आणि राज्यातील प्रत्येक खेळाडू पोरका झाला आहे. समस्या सोडवण्यासाठी ताकदीने उभा राहणारा महाराष्ट्र खो-खो संघटनेचा ‘पालक’ हरवला आहे. क्रीडा क्षेत्राला बळ देणारा असा नेता, असं नेतृत्व पुन्हा होणे नाही. आदरणीय अजितदादा, तुम्ही जिथे कुठे असाल, तिथून महाराष्ट्राच्या या खेळाडूसह आम्हा क्रीडा क्षेत्रातील कार्यकर्त्यांना असाच आशीर्वाद देत राहा. तुमच्या स्वप्नातील बलशाली क्रीडा महाराष्ट्र घडवणे हीच तुम्हाला खरी श्रद्धांजली ठरेल.

Post Views: 114
Previous Post

आमटे दांपत्य मामासाहेब जगदाळे समाज परिवर्तन पुरस्काराने सन्मानीत

Next Post

करकंब पोलीस ठाणे हद्दीमध्ये पोलिस पथकाचे पथसंचलन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

करकंब पोलीस ठाणे हद्दीमध्ये पोलिस पथकाचे पथसंचलन

ताज्या बातम्या

20 हजार लाडू अन रक्तदान शिबीरासह साजरा झाला प्रकट दिन#public #marathinews #solapurnews #viral #viral

February 8, 2026

मोहोळजवळील एका ढाब्यावर रात्री ११ वाजता दोन ईव्हीएम मशीन आढळून आल्याची घटना समोर आली आहे.#public

February 8, 2026

२० हजारबलाडू वाटप अन रक्तदान शिबिरासह साजरा झाला प्रकट दिन..#public #marathinews #solapurnews #viral

February 8, 2026

आमच्या कार्यकर्त्याला मारहाण केली खा. मोहिते पाटलांचा आरोप.#marathinews #public #viral #aajsolapur

February 8, 2026

प्रिसिजन संगीत महोत्सव सतार स्वराची सजली मैफिल.#public #marathinews #solapurnews #viral #aajsolapur

February 8, 2026

बसवण्णाच्या चबुतरासह पुतळ्याचेही दुरुस्ती काम सुरू#public #marathinews #solapurnews #mh13 #viral

February 8, 2026

शासकीय चित्रकला ग्रेड स्पर्धेत युनिक इंग्लिश मीडियम स्कूलचे घवघवित यश

February 8, 2026

माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त पुस्तके वाटप

February 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0666197

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697