Saturday, October 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

डब्ल्यू.आय.टी.मध्ये मुनीश्री १०८ सुप्रभसागरजी महाराज यांचे विशेष प्रवचन; विद्यार्थ्यांसाठी गुरुमंत्र

तरुण भारतbyतरुण भारत
October 24, 2026
in solapur
0
डब्ल्यू.आय.टी.मध्ये मुनीश्री १०८ सुप्रभसागरजी महाराज यांचे विशेष प्रवचन; विद्यार्थ्यांसाठी गुरुमंत्र
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : ‘मला काय मिळाले?’ यापेक्षा ‘मी काय दिले?’ हा विचार महत्त्वाचा आहे. ‘माझी संस्था, माझे कर्तव्य आणि माझे योगदान’ या भावनेतून जबाबदारी पार पाडणे, संस्थेच्या विकासासाठी योगदान देणे आणि माणसांना परस्परांशी जोडणे, हाच माणुसकीचा धर्म असून जैन तत्त्वज्ञानाच्या आचरणाचीही ती पहिली पायरी आहे, असे प्रतिपादन मुनीश्री १०८ सुप्रभसागरजी महाराज यांनी केले. नैतिक शिक्षणासाठी विशेष उद्बोधन देताना त्यांनी हे विचार मांडले.

वालचंद शिक्षण समूहातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शनिवारी (दि. २४ ऑक्टोबर) वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ‘सम्यकज्ञान’ विषयावर आयोजित विशेष प्रवचनात ते बोलत होते. या वेळी मुनीश्री प्रणतसागरजी महाराज आणि क्षुल्लकश्री विप्रज्ञसागरजी महाराज उपस्थित होते.

कुटुंब हा मानवी जीवनाचा मुख्य आधार असून, नातेवाईक आणि आप्तेष्टांसह सुख-दुःखात सहभागी होऊन परस्परांना आधार देणे महत्त्वाचे आहे. मोठी घरे, संपत्ती आणि सुखसोयींपेक्षा माणुसकी, जिव्हाळा आणि सहकार्य श्रेष्ठ आहे. संपत्तीचा उपयोग इतरांच्या कल्याणासाठी करण्यातच तिचे खरे सार्थक आहे, असे महाराजांनी सांगितले.

या प्रसंगी आचार्य विरागसागरजी महाराज आणि आचार्य विशुद्धसागरजी महाराज यांच्या प्रतिमेचे अनावरण वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी, सौ. माया गांधी, विश्वस्त पराग शहा, वैभव गांधी तसेच समूहातील सर्व प्राचार्य यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या प्रवचनाचा लाभ सोलापूरमधील जैन समाजबांधवांनी मोठ्या संख्येने घेतला.

‘माझी संस्था, माझे कर्तव्य आणि माझे योगदान’ या भावनेतून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि व्यवस्थापनाने संस्थेच्या प्रगतीसाठी सक्रिय सहभाग नोंदवावा.

आधुनिक तंत्रज्ञान आणि भौतिक सुविधांसोबत विद्यार्थ्यांना संवेदनशील, जबाबदार व समाजाभिमुख नागरिक म्हणून घडवणे, हेच शिक्षणाचे खरे उद्दिष्ट आहे. प्रत्येकाने कर्तव्याचे प्रामाणिकपणे पालन करून समाजाच्या उन्नतीसाठी योगदान द्यावे, हा महाराजांनी दिलेला गुरुमंत्र आहे.

Post Views: 9
Previous Post

#shorts #viral #brekingnews #solapurnews #maharashtranews

Next Post

राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी गायत्री मस्केची निवड

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी गायत्री मस्केची निवड

राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी गायत्री मस्केची निवड

ताज्या बातम्या

पावसाळा संपला; बार्शीच्या जलसाठ्यांनी वाढवली टंचाईची धास्ती 

पावसाळा संपला; बार्शीच्या जलसाठ्यांनी वाढवली टंचाईची धास्ती 

October 24, 2026
मंद्रूपच्या संतोष पाटील महाविद्यालयाच्या महिला उपविजेत्या

मंद्रूपच्या संतोष पाटील महाविद्यालयाच्या महिला उपविजेत्या

October 24, 2026
श्री शिवाजी महाविद्यालयाच्या ज्युदो खेळाडूंची आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत चमकदार कामगिरी

श्री शिवाजी महाविद्यालयाच्या ज्युदो खेळाडूंची आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत चमकदार कामगिरी

October 24, 2026
आंतरशालेय योगासन स्पर्धेत मॉडेल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश” 

आंतरशालेय योगासन स्पर्धेत मॉडेल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश” 

October 24, 2026
भुईकोट किल्ल्याच्या संवर्धन व जिर्णोद्धारासाठी शिवसेवक प्रतिष्ठानचे पुरातत्त्व विभागाला निवेदन

भुईकोट किल्ल्याच्या संवर्धन व जिर्णोद्धारासाठी शिवसेवक प्रतिष्ठानचे पुरातत्त्व विभागाला निवेदन

October 24, 2026
देवी भक्तांसाठी  वळसंगमध्ये सेवासुविधांचा आधार

देवी भक्तांसाठी  वळसंगमध्ये सेवासुविधांचा आधार

October 24, 2026
४,७७७ रेशन कार्डे पूर्ववत करा; अन्यथा धरणे आंदोलन — काँग्रेसचा पुरवठा विभागाला इशारा

४,७७७ रेशन कार्डे पूर्ववत करा; अन्यथा धरणे आंदोलन — काँग्रेसचा पुरवठा विभागाला इशारा

October 24, 2026
महाभोंडल्याचे निमित्ताने. सुनेत्राताई पवार यांचा पाणीबचतीचा व जलसंवर्धनाचा संदेश

महाभोंडल्याचे निमित्ताने. सुनेत्राताई पवार यांचा पाणीबचतीचा व जलसंवर्धनाचा संदेश

October 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1403104

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!