सोलापूर : प्रबुद्ध भारत चौक, मिलिंद नगर, बुधवार पेठ, सोलापूर या ठिकाणी प्रबुद्ध भारत तरुण मंडळ (पी.बी.ग्रुप) चे प्रमुख मार्गदर्शक आनंद चंदनशिवे व भारत बाबरे यांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आनंद चंदनशिवे यांनी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच मनोगत व्यक्त करताना म्हणाले माता रमाई यांनी अत्यंत संघर्षमय जीवन जगत असताना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक व राजकीय चळवळीत मोलाची साथ दिली.
यावेळी भीम तळभंडारे, नाना कापुरे, सुरज वाघमोडे, प्रतीक चंदनशिवे व पी. बी. ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.























