बिलोली – शहरातील नवीन बसस्थानक शेजारी असलेल्या विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भव्य सुशोभीकरणाचे काम करण्यात येणार आहे.लोकनियुक्त नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्या पुढाकारातून करण्यात आलेल्या या कामाचे भूमिपुजन आज माता रमाई जयंती चे औचित्य साधून मान्यवारांच्या उपस्थितीत करण्यात आले.
बिलोली शहरातील बसस्थानक शेजारी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा आहे.सन २०२१ मध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्या पुढाकारातून अवघ्या तेरा दिवसामध्ये भव्य पूर्णकृती पुतळा उभा राहिला.अनेक दिवसांपासून पुतळ्याच्या सुशोभीकारण करण्याची आंबेडकरवादी अनुयायांची मागणी होती.
नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी पुढाकार घेवून पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याचे काम हाथी घेतले असून आज शनिवारी माता रमाई जयंती चे औचित्य साधून कामाचे भूमिपूजन करण्यात आले.नांदेड येथील वास्तुविशारद यांच्या संरचनेतून भव्य असे काम होणार आहे. येणाऱ्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पूर्वी हे काम पूर्णत्वास येणार असल्याचे नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी सांगितले.
भूमिपूजन प्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी, उपाध्यक्ष अनुप अंकुशकर, माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका मैथिली कुलकर्णी, जेष्ठ पत्रकार तथा नगरसेवक प्रतिनिधी प्रकाश पोवाडे, नगरसेविका अनुपमा गायकवाड, नगरसेवक अब्दुल फिरदोस, वसीम बेग इनामदार, शिवाजी गायकवाड, राजू कुडके, गंगाधर पुपलवार, पत्रकार धम्मपाल जाधव, महेंद्र गायकवाड, मुकिंदर कुडके, किरण लघुळकर, बाळासाहेब लाखे, शेख इलियास, शिलानंद बुद्धेवार यांच्यासह आंबेडकर अनुयायांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

























