सोलापूर : शहर भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या अध्यक्षपदी आप्पासाहेब हिप्परगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आप्पासाहेब हिप्परगे यांच्या संघटन कौशल्य, कार्यनिष्ठा, सामाजिक कार्यातील सक्रिय सहभाग तसेच पक्षप्रती असलेली निष्ठा लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टी सोलापूर शहराच्या अध्यक्षा रोहिणीताई तडवळकर यांनी ही नियुक्ती केली आहे.
या नियुक्तीच्या माध्यमातून सोलापूर शहरातील अनुसूचित जमाती समाजामध्ये पक्षसंघटन अधिक मजबूत करणे, जनतेशी थेट संपर्क वाढवणे तसेच भारतीय जनता पार्टीचे विचार अधिक व्यापक पातळीवर पोहोचवणे अपेक्षित आहे.यावेळी अध्यक्षा सौ. रोहिणीताई तडवळकर यांनी आप्पासाहेब हिप्परगे यांना नियुक्तीपत्र प्रदान करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आणि पक्षसंघटन बळकट करण्यासाठी ते अथक परिश्रम करतील, असा विश्वास व्यक्त केला.

























