सोलापूर – सांगली येथील श्री साई समर्थ फाऊंडेशनच्या, सोलापूर शाखेच्या वतीने देण्यात येणारे विविध स्तरावरील राज्य पुरस्कार समाजातील मान्यवरांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. पोलीस उपअधिक्षक प्रताप पोमण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सोहळ्यासाठी, नूतन उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, निवृत्त प्राध्यापक भीमाशंकर बिराजदार, निवृत्त प्राचार्य नरेश बदनोरे, निवृत्त प्राचार्य तथा जिल्हा शाखाध्यक्ष डॉ. अजित माणिकशेटे जिल्हा परिषद सांगलीचे कार्यक्रमाधिकारी संतोष ढवळे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते श्रीमती भागीरथी बिराजदार (अंगणवाडी सेविका) बबिता राठोड (अंगणवाडी सेविका) सिद्धारुढ काळे (समाजभूषण) निसार शेख (युवा उद्योजक तथा ग्राम सुधारक) जगदेवी माणकोजी (शिक्षिका) लक्ष्मण हंजगे (समाजभूषण तथा प्रगतशील शेतकरी) रविकुमार सोलापुरे (शिक्षण रत्न) मल्लिकार्जुन पाटील (शिक्षण भूषण) अरुण धुमाळ (जीवनगौरव) राजेंद्र पाटील (अभियंता) तेजश्री तळे, (शिक्षिका) नसरीन माशाळकर (शिक्षिका) हेमलता होटकर (शिक्षिका) यांना मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक, स्वागत डॉ. अजित माणिक शेटे यांनी केले. सूत्रसंचालन संतोष ढवळे यांनी केले तर आभार प्रदर्शन अरुण धुमाळ यांनी केले.
अध्यक्षांसह सर्व मान्यवरांनी संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक करुन समाजातील अशा मान्यवरांना पुरस्कार देऊन प्रेरणा देण्याचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगितले. या पुढेही असेच विविध उपक्रम राबवावेत, असे सूचित केले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..






















